रासायनिक खतांचा बेसुमार दरवाढी विरोधात रा.काॅं.पार्टी देसाईगंजच्या वतीने केंद्र सरकारचा तिव्र निषेध

0
615

रासायनिक खतांचा बेसुमार दरवाढी विरोधात रा.काॅं.पार्टी देसाईगंजच्या वतीने केंद्र सरकारचा तिव्र निषेध

रा.काॅं. देसाईगंज तर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन सादर

सुखसागर झाडे : आज दिनांक १९.०५.२०२१ तहसील कार्यालय देसाईगंज येथे खतांच्या किमती व पेट्रोल दरवाढ बेसुमार वाढ केल्याने केंद्र सरकारच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज बेसुमार वाढत असून पेट्रोलचे देशात शंभरी पार केली आहे. त्यातच केंद्रातील भाजप सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ करून देशातील शेतकऱ्यांना दुसरा मोठा धक्का देण्याचे काम केले आहे.
केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या१०:२६:२६ ची किंमत प्रति बॅग ६०० रुपयांनी तर डीएपी ची किंमत प्रति बॅग ७१५ रुपयांनी वाढविले. त्यामुळे कोरोना च्या महामारीत अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सध्याच्या भाजपा केंद्र सरकारने केले आहे.
केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करीत आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी..
निवेदन देताना युनूस शेख प्रदेश संघटक सचिव,श्याम धाईत जिल्हा सरचिटणीस, तालुका अध्यक्ष क्षितिज उके, शहर अध्यक्ष लतीफ शेख, किशोर भाऊ तलमले जेष्ठ नेते रा.काॅ.पा.जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, नेते,अजय गोरे वरिष्ठ नेते, भुवन लिल्हारे जिल्हाध्यक्ष कला व सांस्कृतिक विभाग, राहुल पुस्तोडे जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया सेल, कपिल बोरकर तालुका अध्यक्ष सोशल मीडिया विभाग, रोशन शेंडे तालुका उपाध्यक्ष, भास्कर वाटकर तालुका कोषाध्यक्ष, खुर्शीद शेख,दाउद शेख, सत्यवान रामटेके युवा कार्यकर्ते, नामदेव वसाके खालिद शेख, बाबू भाई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here