बनावट देशी दारू विक्रीचा अखेर पर्दाफाश

0
109

बनावट देशी दारू विक्रीचा अखेर पर्दाफाश

गडचिरोली : चंद्रपूर / गडचिरोली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येनापुर, चित्तरंजनपुर, आंबोली या ठिकाणी छापा टाकून अंदाजे दोन लक्ष सहा हजार साठ रुपये किंमतीची बनावट देशी दारू हस्तगत केली. तीन वारस गुन्हे नोंदवून दोन इसमास अटक करण्यात आली. तर दोन इसम पसार झाले. पसार झालेल्या इसमापैकी बनावट देशी दारू पुरवठा करणारा मुख्य आरोपी जैरामपुर येथील रहिवाशी अमित लक्ष्मण गोटपर्तिवार हा छापेमारीचा सुगावा लागल्याने पसार होण्यात यशस्वी झाला असून तपास सुरू आहे.

सदर कार्यवाही नागपूर विभाग विभागीय आयुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर चे अधीक्षक संजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर / गडचिरोली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक निरीक्षक ईश्वर वाघ, राजुरा चे निरीक्षक अभिनंदन कांबळे, दुय्यम निरीक्षक मोनाली कुरुडकर व कर्मचारी यांनी कारवाही पार पाडली.

सदरील गुन्ह्याचा तपास चंद्रपूर / गडचिरोली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक ईश्वर वाघ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here