राजुरा शहरात अंदाधुंद गोळीबाराची घटना ताजी असतानाच चाकूने भोकसून खुनाचा प्रयत्न, तीन आरोपी अटकेत…

0
5227

राजुरा शहरात अंदाधुंद गोळीबाराची घटना ताजी असतानाच चाकूने भोकसून खुनाचा प्रयत्न, तीन आरोपी अटकेत…

राजुरा, ४ ऑगस्ट : एकेकाळी शांत संयमी असलेला राजुरा तालुक्याचे ठिकाण. अवैध गुन्हेगारी मध्ये राजुरा शहर अग्रेसर ठरताना दिसत आहे. राजुरा शहरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता कायदा व सुव्यवस्था अवैध धंदेवाइकांची रखेल झाली की काय? असे एक ना अनेक प्रश्न रोज राजुरा वासियांना भेडसावू लागले आहेत. आणि याला राजकारणी पुढारी आपल्या मांडीवर घेऊन मिरवत असल्यामुळे पोलीस अधिकारी सुद्धा हतबल ठरत आहेत असे बोलके चित्र नेहेमी बघायला मिळते. व त्यातून अशी गुन्हेगारी वृत्तीची तरुणाई जन्माला येतेय… हा भविष्यासाठी खूपच घातक इशारा आहे. राजुरा शहर गुन्हेगारीत अग्रेसर होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. पुन्हा राजुरा शहरात जीवघेणा चाकू हल्ला झाला. शहरात अंदाधुंद गोळीबार झालेली घटना अजून ताजी असतानाच परत चाकू हल्ल्याने पोलीस विभागासमोर या गुन्हेगारीवर आळा घालण्याचे मोठे आव्हान पुढे ठाकले आहे.

काल रात्री ८ वाजेच्या सुमारास फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या विक्रांत महेश रामटेके (२०) या इंदिरानगर येथील युवकावर तिघांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना नागराज कॅफे सारख्या वर्दळीच्या ठिकानी असलेल्या ट्रेंड्स जवळ घडली.

सविस्तर वृत्त असे की, विक्रांत महेश रामटेके याला आरोपीनी ट्रेंड्स शोरूम जवळ फोटो शूट चा ऑर्डर साठी बोलावले. फोटो शूट विषयी बोलणी झाल्यावर विक्रांत जायला निघाला असता एका ने जिवे मारण्याच्या हेतूने चाकू ने हल्ला चढविला. त्याच वार त्याच्या छातीवर गेला व रक्ताची चिरकांडी उडाली व तो घाबरून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी विक्रांत ट्रेंड्स शोरुम मध्ये लपून बसला. त्याचा मित्र त्याच्या सोबत होता व तो त्याला फोन करू लागला पण घाबरलेला विक्रांत त्याचा कॉल घेईना जेव्हा रक्तस्त्राव होऊन त्याला चक्कर व डोळ्या समोर अंधारी आली तेव्हा मित्राला फोन करून झालेला प्रकार सांगत डोळ्याला अंधारी येत असल्याने आत बोलावून घेतले. मित्राने विक्रांतच्या डोळ्यावर पाणी शिंपडून आणि सुजाण नागरिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने विक्रांतला चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा हल्ला जिवे मारण्याच्या उद्देशाने पूर्व वैमनस्यातून शुल्लक कारणावरून करण्यात आला. यामुळे संपूर्ण राजुरा शहर हादरले असून गुन्हेगारीत वाढ होत असल्याने सुजाण नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर ठपका ठेवण्यात येत आहे.

राजुरा पोलिसांनी २४ तासांच्या आत तिन्ही आरोपींना नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. एसडीपिओ साखरे, परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरेश उरकुडे, एपिआय धर्मेंद्र जोशी, पिएसआय वडतकर, रवि तूरनकर, विनोद पडवाळे, पोशी मंगेश, अविनाश बांबोळे यांनी सदर आरोपींना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here