बालपंचायात च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

0
254

बालपंचायात च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

चामोर्शी/तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 28/11/2023 ला डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय वायगाव येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी शालेय बालपंचायात च्या माध्यमातून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिश कनाके (सांस्कृतिक मंत्री) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिमांशु बांबोळे (मुख्यमंत्री) यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वाढई सर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बनसोड सर, वालदे सर, उराडे सर, गजभिये सर, बांबोले सर, प्रवजा उंदीरवाडे मॅडम,नागेंद्र नेवारे हे होते.
सदर कार्यक्रमात मुलांनी आपल्या भाषणातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. या कार्यक्रमात मुलांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मृणाल निमसरकार (उपुख्यमंत्री) यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालपंचायतच्या सर्व मंत्री मंडळांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here