घोडपेठ येथील विठ्ठल रुक्माई देवस्थान प्रांगणात भव्य किर्तन सोहळा

0
218

घोडपेठ येथील विठ्ठल रुक्माई देवस्थान प्रांगणात भव्य किर्तन सोहळा

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील विठ्ठल रुक्माई देवस्थान प्रांगणात रविवारी २७ नोव्हेंबर २०२३ रात्री ७ वाजता भव्य किर्तन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र आमदार प्रतिभाताई धानोरकर होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना किर्तन हे जनजागरणाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी कीर्तनकार ह. भ. प. श्री. पुंडलिकराव गाडगे महाराज, सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदीप देवगडे, देवस्थान कमिटीचे ईश्वर निखाडे, अशोक येरगुडे, माजी सैनिक नरेंद्र चाफले, माजी सैनिक पुजाराम तुरारे, माजी सैनिक मेजर शेंडे, याचे सह माजी सरपंच कवडू पाटील ठाकरे, शेखर रंगारी, सौ. विमल निमकर, श्रीमती तानेबाई परचाके, सौ वैशाली उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे, विनोद मडावी, कांताबाई बोबडे, कविता शेरकी, देवा शंकावार, रोशन रामटेके, वैशाली तेलांडे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात माजी सैनिक व माजी सरपंच याचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. या सोहळ्यात ह. भ. प. पुंडलिकराव गाडगे महाराज यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विठ्ठल-रुक्माईच्या भक्तीचा आणि भगवतगीतेतील तत्त्वज्ञानाचा सखोल आढावा घेतला. त्यांच्या प्रवचनांमध्ये श्रोत्यांना भगवंताच्या चरणी लीन होण्याचे आवाहन केले.

या सोहळ्याला भद्रावती तालुक्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी किर्तन सोहळा आनंदाने साजरा केला. या सोहळ्याचे आयोजन घोडपेठ येथील विठ्ठल रुक्माई देवस्थान समितीने केले होते. यात अरुण मिलमिले, लहू जोगी, संजय नागपुरे, रमेश उरकुडे, सूरज गेडाम, धनराज गानफाडाळे, अरुण बेरड, नामदेव किरतकर, जांभुवंतराव विरुटकर, राजू मशारकर, राजू मसराम, गोपाळ जोगी, महिला मंडळ सीमा मिलमिले, संगीता निखाडे, वर्षा कोगरे, छाया महाकुलकर, सपना बेरड, ज्योती जोगी, शान्ताबाई चामाटे, कविता नागपुरे, वनिता ठाकरे, चंद्रकला डाहुले, आदींनी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी देवस्थान समितीने सर्वतोपरी तयारी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here