यात्रेवरून परत येताना म्हैस आदळल्याने ऑटो पलटला ; चार जखमी -देवाडा खुर्द गावाजवळ झाला अपघात

0
1716

यात्रेवरून परत येताना म्हैस आदळल्याने ऑटो पलटला ; चार जखमी -देवाडा खुर्द गावाजवळ झाला अपघात

पोंभूर्णा :- मार्खंडा येथील महाशिवरात्री यात्रेवरून परत येताना पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द गावाजवळ म्हैस आदळल्याने ऑटो पलटून चार लोक गंभीर जखमी झाले असून यात दोन चिमुकल्याचा समावेश आहे. विदर्भाची काशी असलेल्या मार्खंडा येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.येथे दर्शनासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. बल्लारशहा येथून काही भाविक मार्खंड्याला यात्रेसाठी गेले होते.दर्शन करून परत येत असताना पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द गावाजवळ ऑटोला म्हैस आदळल्याने ऑटो (एमएच-३४-बिएच-१२०३) पलटून चार जखमी झाले.यात मामाकडे आलेली दिपाली गजानन येसने रा.पळसमंडळ जि.अमरावती हिला गंभीर मार लागला असून तीचा हात व पाय फॅक्चर झाला आहे.जखमी मध्ये मृण्मयी सुरजोगे वय ९ वर्ष रा.बल्लारशाहा,तक्ष रवि सुरजोगे वय ११ वर्ष रा.बल्लारपूर व रवि सुरजोगे वय ३९ वर्ष रा.बल्लारपूर जखमी असून चौघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले.घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.

माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा असाही सोदार्यपना

देवाडा खुर्द मार्गावर आटो पलटी झाल्याची घटना माहिती होताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका ला फोन करून ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे उपचारासाठी पाठविले.रुग्नालयात भेट देऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here