
आज दिनांक 4 मार्च 2023 रोज शनिवारला दुपारी 12 वाजता महाविकास आघाडी तालुका पोंभुर्णा द्वारा आयोजित आमदार मा. सुधाकर गोविंदराव अडबाले (विधान परिषद सदस्य) यांचा जाहीर सत्कार समारंभ जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी ता. पोम्भूर्णा जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे पाहुण्यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच फटाक्यांच्या अतिषबाजीने स्वागत करण्यात आले तसेच महाराष्ट्र पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शाळेच्या मुलींच्या हस्ते कुमकुम तिलक लावून जंगी स्वागत केले.विचारमंचा जवळ येताच तिथे असलेल्या भारतीय थोर महापुरुष ,समाजसेवक महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून द्वीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून मान. बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्र तर सत्कारमूर्ती म्हणून मान. सुधाकर जी अडबाले सर विधान परिषद सदस्य हे होते. तसेच या सत्कार समारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मान सौ. प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा विधानसभा क्षेत्र, मान. विनोदभाऊ अहिरकर अध्यक्ष जनसेवा ग्रामीण विकास संस्था नांदगाव तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर हे स्वागताध्यक्ष होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मान. सौ सीमाताई अडबाले मॅडम, मान. रविभाऊ मरपल्लीवार तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पोंभुर्णा,मान. विजयजी ढोंगे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी पोंभुर्णा , मान. आशिष कावटवार तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पोंभुर्णा, मान. सुनील शेरकी सर जिल्हा उपाध्यक्ष विमाशी संघ चंद्रपूर, मान. गंगाधर कुनघाडकर जिल्हा उपाध्यक्ष विमाशी संघ चंद्रपूर, मा. प्रकाश पाटील मारकवार माजी अध्यक्ष जि. प. चंद्रपूर, मा. बघेल सर, मा. . वनिता ताई वाकुडकर सरपंच दिघोरी,मा. लोनबले सर, मा. रोहिणी राकेश नैताम सरपंच बोर्डा, मा. रोषणाताई लोळे सरपंच घोसरी, मान. मनोज अहिरकर सर मुख्याध्यापक दिघोरी हे होते.मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे जनसेवा शाळेच्या मुलींची चमू व श्री सुनील कोहपरे सर यांनी संगीत स्वर देऊन स्वागतगीत गाऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी झाडीपट्टी स्वर बहाद्दर श्री. संतोष वरपल्लीवार सर व संच यांनी महाराष्ट्र राज्य गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मा. बाळूभाऊ धानोरकर यांचे सत्कार मान. विनोद भाऊ अहिरकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी केले तसेच जनसेवा ग्रामीण विकास संस्था अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सुद्धा स्वागत केले , प्रमुख अतिथी म्हणून मान. सौ. प्रतिभाताई धानोरकर यांचे स्वागत जनसेवा ग्रामीण विकास संस्था चे अध्यक्ष तसेच कर्मचारी खडसंग मॅडम , मा. रोशणाताई लोडे सरपंच घोसरी,मा. रोहिणीताई नैताम सरपंच बोर्डा, मा. दर्शनाताई वाकडे माजी सरपंच चकठाणा, सौ वनिताताई वाकुडकर सरपंच दिघोरी यांनी केले तसेच सत्कारमूर्ती म्हणून आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मान. सुधाकर जी अडबाले सर यांचे स्वागत महाविकास आघाडीच्या वतीने मान. विनोद भाऊ अहिरकर, मान. रविभाऊ मरपल्लीवर, मान. विजयजी टोंगे, मान. आशिष कावटवार यांनी सुद्धा केले तसेच सरांचे स्वागत जनसेवा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका पोंभुर्णा सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते मुख्याध्यापक संघ पोंभुर्णा तसेच राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाळाच्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आला. साईकृपा विद्यालय चिंतलधाबा मान. एलटीवार सर, मान. मुसळे सर यांनी सुद्धा अडबाले सरांचे स्वागत आणि सत्कार केला तसेच महात्मा फुले विद्यालय घाटकुळ च्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.सौ. प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या भाषणामध्ये अत्यंत ज्वलंत विषयावर भर दिला त्यांनी मार्गदर्शनात म्हणाले की जुनी पेन्शन योजना व विनाअनुदानित शाळांच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढू तसेच या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून मान. बाळूभाऊ धानोरकर यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असे आवाहन केले तर सत्कारमूर्ती मान. सुधाकरजी अडबाले सर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विविध शैक्षणिक समस्या ,जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळांचा प्रश्न आणि इतर शैक्षणिक प्रश्नांना लवकरात लवकर सोडवून सर्व शिक्षकांना जनतेला न्याय देऊ असे प्रतिपादन केले. यावेळी या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर मा. विनोद भाऊ अहिरकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार अविनाश रामटेके तर आभार प्रदर्शन जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी चे मुख्याध्यापक मान मनोज अहिरकर सर यांनी मानले.यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिलीप पा. म्याडावर, वसंत पा. मोरे, अमित पाल, नंदू कुमरे, विनोद थेरे, शंकर वाकुडकर उपसरपंच दिघोरी, सुरज कुंभारे ग्रा. प. सदस्य दिघोरी, प्रशांत झाडे माजी उपसरपंच घोसरी, विजय बोमावर बेंबाळ, करनु पा. काळे, हेमंत आरेकर, साईनाथ गोहणे, किशोर अर्जुनकर, बापूजी पा. चिंचोलकर माजी सभापती प.स. पोंभुर्णा. जनसेवा विद्यालय येथील शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आणि महाविकास आघाडी तालुका पोम्भूर्णा द्वारा आयोजित आमदार मान. सुधाकरजी अडबाले सर यांचा जाहीर सत्कार समारंभ हजारो कार्यकर्ते, शिक्षक बांधव , गावकरी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात, आनंदात संपन्न झाला.