राजूरा येथे आदिवासी मुलीची छेड, कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी

0
5735

राजूरा येथे आदिवासी मुलीची छेड, कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी

चांडक कृषी केंद्राचे राजू चांडक व त्यांचा सहकारी मामा ह्यांच्यावर राजूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राजूरा / प्रतिनिधी : चांडक कृषी केंद्र चालकाच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत राहत असणार्‍या मुलींना लॉक डाऊन मध्ये एकांताचा फायदा घेत मुलीं ला तुला पैसे देतो तू मला शारीरिक सुख दे अशी हात पकडून मागणी केली. तुझे इथे कोणी नाही जास्त करु नको आणि कुणाला सांगितली तर मी तुला जिवानिशी मारून टाकेल अशी धमकी दिली.
राजूरा येथील सामाजिक कार्यकर्ते ह्यांना झालेल्या घटनेची आपभीती स्वतः पीडित मुलीने सांगताच सामाजिक कार्यकर्ते व पीडित मुलगी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
पोलिस कारवाई करण्याच्या भीतीने दोन्ही आरोपी फरार झाले. कारवाई साठी गेलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना खाली हात परत यावे लागले.
राजूरा तालुक्‍यात आदिवासी जनतेवर वारंवार अत्याचार होताना काही काळात बघायला मिळत आहे. तरी लोकप्रतिनिधी व पोलिस विभाग ह्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी बीरसा क्रांती दल, व आदिवासी सामाजिक संघटने कडून करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here