मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस उडविले

0
5472

मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस उडविले

बल्लारपूर :- राज जुनघरे

बल्लारपूरकडून आललापली कडे जाणारी चारचाकी क्र. DL9 CAU 9750 कार भरधाव कोठारीवरून राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना झरण टर्निंगवर गोंडपीपरी कडून येणाऱ्या दुचाकीस क्र. MH 34 U 3681 ला उडविले. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

बल्लारपूरकडून कोठारी मार्गाने आल्लापल्ली कडे कार भर दुपारी जात होती.कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता.त्याचा अपघात कोठारीत होताहोता वाचला. पुढे काही अंतरावर असलेल्या रहदारी पोलिसांस तो उडविणार होता मात्र थोडक्यात बचावला.सदर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झरण टर्निंगवर त्याने गोंडपीपरिकडून येणाऱ्या दुचाकीस उडविले.त्यात दुचारी स्वार गंभीर जखमी झाले.सदर माहिती कोठारी पोलिसांना समजताच घटनास्थळावर तातडीने दाखल झाले.अपघातग्रस्त जखमींना कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व पुढिल उपचारार्थ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात रवाना केले .अपघातातील कारमध्ये चालक एकटाच होता.तो मात्र बचावला.त्याचे गाडीत विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.तो भरपूर प्रमाणात मद्य प्राशण करून होता.तो व्यवसायाने अभियंता असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.पोलीसानी गुन्हा दाखल केला असून जखमीचे व कार चालकाचे नाव वृत्त लिहिपर्यंत कळले नाही .पुढील कारवाई कोठारी पोलीस करीत आहेत.

  या घटनेतील जखमी चा मृत्यू

कोठारी पोलिसांकडून सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार जखमी पैकी संदीप गौरकर वय २४ रा. विठ्ठलवाडा ता.गोंडपिपरी याचा उपचारार्थ मृत्यू माहीती आहे. कोमल धुडसे वय २६ घडोली हा जखमी असुन त्याचेवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here