येनबोथला येथे महाशिवरात्री दरम्यान देवदर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

0
4894

येनबोथला येथे महाशिवरात्री दरम्यान देवदर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

तालूक्यातील येनबोथला येथे नदी स्थळी देव-दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते.अश्यातच दि. ११ गुरुवारी रोहित जोगेश्वर देठे हा १५ वर्षीय युवक आई सोबत एनबोथला येथे आला असता आंघोळी करिता मित्रा सोबत पाण्यात उतरला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली .
महाशिवरात्री दरम्यान तालुक्यातील बरेच भाविक येनबोथला येथे देव दर्शनासाठी गोळा होतात.कोविळ -19 च्या संसर्गामुळे प्रशासनाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या मार्कंडा (देव) चपराळा, कुलथा या प्रसिद्ध स्थळी महाशिवरात्री दरम्यान जी भव्य यात्रा भरली जाते;तीथे भाविकांची गर्दी होत असल्याने
सदर ठिकाणी यात्रा भरविण्यास प्रशासनाने मज्जाव केला. त्यामुळे परीसरातील बरेच भाविक येनबोथला येथील नदीकिनारी वसलेल्या मूर्तीच्या देवदर्शनाकरिता तसेच पूजा अर्चना- करण्याकरिता आले पाहता पाहता सदर ठिकानि भाविकाची तोबा-गर्दी झाली.गोंडपीपरी येथील रोहित जोगेश्वर देठे वय १५ वर्ष नामक युवक आंघोळी करिता नदीत उतरला होता आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली.हजर असलेल्या भाविकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले असून एका स्कारपीओ वाहनात टाकून ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरीला नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here