मा. कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावर यांच्या आमदार निधीतील २५-१५ च्या कामा अंतर्गत दोंदुडा येथे समाज भवनाचे लोकार्पण

0
441

मा. कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावर यांच्या आमदार निधीतील २५-१५ च्या कामा अंतर्गत दोंदुडा येथे समाज भवनाचे लोकार्पण

अनंता वायसे

आज दिनांक 22-10-2020 ला मा.श्री. आकाश भाऊ पोहाने भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
दोंदुडा ग्रामवासी यांची समाज भवनाची मागणी अनेक वर्षापासून होती या समाज भवनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे छोटेमोठे कार्यक्रम या समाज भवनामध्ये व्हावे तसेच गावातील तरुण युवक-युवती त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण शिबिर तसेच व्यक्तिमत्व विकास शिबीर यासारखे कार्यक्रम या समाज भवनामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून व गावकऱ्यांसाठी एक हक्काची जागा व्हावी हे दोंदुडा येथील निवासी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मा. कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावर यांनी हे गावकऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले. या भवनांमुळे दोंदुडा गावाला विकासात्मक दृष्टी लाभल्यामुळे आज अनेक वर्षापासून असणारी ही मागणी पूर्ण झाल्याने या गोष्टीचा सर्व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला समाज भवन हे कुठल्याही एका समाजासाठी तयार केलेली वस्तू नसून समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांकरिता तयार झालेली ही वास्तू आहे.
अनेकता मे एकता यही हमारी विशेषता! ही विशेषता जोपासण्याचे काम सुद्धा या समाज भवनाच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे.
सदर या लोकार्पण सोहळ्यामध्ये भाजपा तालुकाध्यक्ष श्री. आकाशभाऊ पोहणे, भाजयुमो तालुकाप्रमुख विठूभाऊ बेनीवार, सरपंच सौ. शीलाताई उगे, उपसरपंच श्री. सुरज वरभे, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती वरभे, जिल्हा परिषद सदस्य श्री. मिलिंद जी कोपुलवार, गावातील पोलीस पाटील गणेशराव इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.धमाने साहेब, ठेकेदार श्री.सौरभ शेळके, श्री.विनोदभाऊ राऊत, भाजपा तालुका महामंत्री, श्री.सुनील चौधरी, उपसरपंच शेकापुर(बाई), श्री.संजय महाकाळकर भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य, संतोषराव गोल्हर, संजय ढाले इत्यादी असंख्य कार्यकर्ते व गावकरी मंडळी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here