आजचा विजय म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेची गॅरंटी! – देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

0
342

आजचा विजय म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेची गॅरंटी! – देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

फटाक्यांच्या आतषबाजीसह राजुऱ्यात भाजपकडून आनंदोत्सव साजरा

राजुरा, दि. ०४ डिसें. : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्याच्या आनंदात भारतीय जनता पार्टी राजुरा विधानसभेच्या वतीने निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात शहरातून विजयी रॅली काढत स्थानिक संविधान चौकात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना, निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांतील आजचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने दिलेली गॅरंटी आहे. पंतप्रधान मोदीजींनी मागील नऊ वर्षांपासून सातत्याने देशभरातील अंत्योदयाच्या कल्याणाचा विचार, स्त्रीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांच्या विकासासाठी आखलेले लोककल्याणकारी विकासाचे सुत्र यामुळे देशातिल जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे आजच्या या अभुतपुर्व विजयाचे ते शिल्पकार ठरले आहेत. याचसोबतच केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या संघटन कौशल्याचा तसेच त्या त्या राज्यातील नेतृत्वाचा खऱ्याअर्थाने हा विजय आहे. या अद्भुत विजयात योगदान देणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मी भाजपा राजुरा विधानसभेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, राजुरा तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, जिवती तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, गडचांदूर शहराध्यक्ष सतिश उपलेंचिवार, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री महेश देवकते, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, सतिश कोमरवेल्लीवार, संजय उपग्नालावार, विनोद नरेन्दुलवार, माजी पं. स. सभापती दिपक सातपुते, गोपिनाथ चव्हाण, सुरेश रागीट, वामन तुराणकर,अरूण डोहे, पुरुषोत्तम भोंगळे, राधेश्याम, अडाणीया, गणेश रेकलवार, नुतनकुमार जिवने, साईनाथ मास्टे,संजय मुसळे,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here