कविटपेठ येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना व चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्ध विहार भव्य उद्घाटन सोहळा संपन्न…
विरूर स्टे./राजुरा, ५ मे :- काल ४ मे रविवारला कविटपेठ येथे औरंगाबाद येथील भदंत अभयपुत्त व त्यांचा संघ यांच्या शुभ हस्ते तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना तर सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पथाडे यांच्या हस्ते चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्ध विहार भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
सकाळी ११ वाजता भदंत अभयपुत्त व त्यांचा संघ यांच्या हस्ते धम्म विधिवत बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. उपस्थित भिक्खू संघाला चिवरदान, भोजनदान यावेळी देण्यात आले. यानंतर विचारमंचावर उपस्थित धम्म प्रचारक यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी भव्य भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला.
सायंकाळी १० वाजता समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा चे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पथाडे, उद्घाटक राजू वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर चे जी के उपरे, गिताताई पथाडे, प्रा. कालिदास मालखेडे, शिक्षक किशोर चांदेकर, पोलीस पाटील प्रेरणा तेलसे, उपसरपंच राहुल बोबाटे, ग्रापं सदस्य आनंदराव देठे, विश्र्वेश्र्वरराव जिवतोडे, सदस्या उषाताई देठे, अनिल तेलसे, पंचशील बौद्ध समाज मंडळ अध्यक्ष महादेव देठे, सचिव लक्ष्मण दुर्गे आदी विचारमंचावर उपस्थित होते. यावेळी गिरिषबाबु खोब्रागडे यांचे सुपुत्र देशक खोब्रागडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विचारमंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना विहाराच्या माध्यमातून सम्यक ज्ञान व धार्मिक आणि सामाजिक विकासासाठी करावा असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे संचालन प्रिती तेलसे तर आभार लक्ष्मण दुर्गे यांनी मानले.
यानंतर गायक भिमेश भारती व गायिका स्वरा तामगाडगे यांचा भीम बुद्ध गीतांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. सदर दिवसभर चाललेल्या बुद्ध मूर्ती स्थापना व बौद्ध विहार उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी पंचशील बौद्ध समाज मंडळाच्या उपासक तसेच उपासिकांनी प्रचंड मेहनत घेतली.