पोलीसांना विधानसभेत उलटे टांगू म्हणणारे माजी पाणीपुरवठा मंत्री व भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची आमदारकी रद्द करा

0
440

पोलीसांना विधानसभेत उलटे टांगू म्हणणारे माजी पाणीपुरवठा मंत्री व भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची आमदारकी रद्द करा

पोलीस बॉईज असोसिएशन चंद्रपूर जिल्हा यांचे वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली मागणी

चंद्रपूर — दिनांक 29 / 11 / 2020 रोजी जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार व महाराष्ट्राचे माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी भ्रमणध्वनी द्वारे परतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्याजवळ परतुरचे प्रोबेशनरी IPS अधिकारी असलेले हसन गौहर यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून IAS व IPS अधिकाऱ्यांचा तसेच महाराष्ट्र पोलीसांचा अपमान करून पोलीसांना विधानसभेत उलटे टांगू असे अपमानजनक वक्तव्य केले होते

त्याच्या निषेधार्थ बबनराव लोणीकर यांचेवर योग्य ती कार्यवाही करून त्यांची आमदारकी रद्द करा या मागणीचे आज पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे मार्फत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन दिले , यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे ,जिल्हा उपाध्यक्ष साहील मडावी ,जिल्हा संघटक सद्दाम अंसारी ,महिला जिल्हा संघटिका मंथना नन्नावरे , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राकेश कोकोडे ,जिल्हा सचिव संजय खोब्रागडे ,जिल्हा सहसचिव अमित वाघमारे , शहर अध्यक्ष देविदास बोबडे ,शहर उपाध्यक्ष बशीरभाई अंसारी ,तालुका अध्यक्ष पियुष डोगरे , जिल्हा संपकं प्रमुख अनिल वैघ ,सहसंपर्क प्रमुख दिलिप ऊरकुंदे अनिल दुधे सोबत उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here