गावातील महिलांसाठी ‘एडवांस टीचिंग ट्रेनिंग’ चा उद्घाटन कार्यक्रम सपन्न…
घुग्घूस : धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ गावांतील महिलांसाठी ‘एडवांस टीचिंग ट्रेनिंग’चे आयोजन करण्यात आले असून, त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचा भव्य समारंभ पार पडला.
ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक अध्यापन कौशल्ये, शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचा मुख्य उद्देश या प्रशिक्षणामागे आहे. प्रशिक्षणानंतर महिलांपैकी काही महिला स्वतःच टीचिंग युनिट तयार करतील, ज्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि इतर महिलांनाही प्रेरणा देतील. महिलांना शिक्षण क्षेत्रात सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या आत्मविश्वासात वृद्धी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. निपा शाह मॅडम यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. धीरज ताटेवर सर उपस्थित होते, तर प्रशिक्षण सत्रासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून विश्वास पानगाडी सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुंदर संचालन सपना येरगुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिल मोहम्मद व आशिष हलगे यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रास सुरुवात झाली आहे. महिलांनी या संधीचा उपयोग करून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.