ब्रेकींग न्युज, मानकी येथे चोरट्यांचा धुमाकुळ, चार घरे फोडली, दोन ते अडीच लाखाचे दागीने लंपास

0
586

ब्रेकींग न्युज,
मानकी येथे चोरट्यांचा धुमाकुळ, चार घरे फोडली, दोन ते अडीच लाखाचे दागीने लंपास

मनोज नवले, वणी

वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मानकी गावात मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ माजवला असुन तब्बल चार घरे फोडली आहेत. तर एका घरातुन सोन्याच्या दागीन्यांसह दोन ते अडीच लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दि.५ ऑगस्टला पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

 

 

सविस्तर असे की, मौजा मानकी येथे गुरुवारी मध्ये रात्री १ ते २ वाजताचे सुमारास अदाजे दोन ते तिन चोरट्यांनी गावातील वार्ड क्र.३ मध्ये शालीक पुंड,बविनोद काकडे, कोंडु चौधरी व महादेव नागपुरे यांच्या घराला लक्ष बनवुन घरफोडी केली.यावेळी विनोद काकडे,कोंडु चौधरी व महादेव नागपुरे यांच्या घरातुन चोरट्यांना खाली हात परतावे लागले परंतु शालीक पुंड यांच्या घरातील आलमारी फोडुन एक सोन्याची पोत, दोन ऑॉगट्या, गोप, सोन्याची जिवती व नगदी १५ हजार रुपये असा एकुण दोन ते अडीच लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे घर फोडी करण्याच्या अगोदर गावातुन बाहेर पडण्यासाठी जागो जागी तापाचे कुंपन कापुन जागा तयार केली. व नंतर घरांना लक्ष केले असावे.हा धुमाकुळ मध्यरात्री १ ते २ वाजताचे सुमारास माजवला असुन दोन ते तिन चोरट्यांचा समावेश असल्याचे दिसुन येत आहे.यावेळी चोरट्यांनी कपाटाच्या च्याब्या,बँग, चप्पल,छत्री असे साहित्य घराजवळच्या परिसरात टाकुन असल्याचे आढळुन आले. सदर घटनेची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here