तक्षशिला बुद्ध विहारात गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती साजरी

0
511

तक्षशिला बुद्ध विहारात गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती साजरी

आज दिनांक 26 मे 2021 रोज बुधवार ला सकाळी 10.30 वाजता तथागत गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती संबुद्ध पंचशील मंडळ गोवरीच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहारात साजरी करण्यात आली.
यावेळी आमच्या वार्ड न 3 चे ग्रामपंचायत सदस्य श्री. सिद्धार्थ कास्वते यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प हार अर्पण केले तर संबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनेश घागरगुंडे यांच्या हस्ते बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करून त्यांनी त्रिवार अभिवादन करून पंचशील ध्वज फडकविण्यात आला. सदर कार्यक्रमाला आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, वार्डातील सर्व उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते. श्री पोपटें सर आणि मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनेश घागरगुंडे यांनी तथागत गौतम बुद्ध यांनी केलेल्या महान कार्याविषयी उपस्थित वर्ग मार्गदर्शन केले. श्री. सुमेश कोल्हे यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here