धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवानिमीत्‍त सुमधुर बुध्‍दभीमगीतांची मेजवानी

0
538

धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवानिमीत्‍त सुमधुर बुध्‍दभीमगीतांची मेजवानी

सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

सुप्रसिध्‍द गायक आनंद शिंदे आणि पार्श्‍वगायिका वैशाली माडे यांची उपस्थिती

 

६६ व्‍या धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवानिमीत्‍त सांस्‍कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे १६ ऑक्‍टोंबर रोजी सायं. ६.३० वा. सुप्रसिध्‍द गायक श्री. आनंद शिंदे व पार्श्‍वगायिका वैशाली माडे यांच्‍या बुध्‍द भीमगीतांच्‍या सुमधूर कार्यक्रमाचे भव्‍य आयोजन करण्‍यात आले आहे.

सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्‍कृतीक कार्य संचालनालयाच्‍या माध्‍यमातुन या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्‍या माध्‍यमातुन नागरिकांना मोठी आनंद पर्वणी उपलब्‍ध होणार आहे. आनंद शिंदे हे विख्‍यात गायक असुन लोकगीतांच्‍या क्षेत्रात त्‍यांनी आपल्‍या गायकीचा ठसा उमटविला आहे. पार्श्‍वगायिका वैशाली माडे या हिंदी व मराठी चित्रसंगीतातील आघाडीच्‍या गायिका आहे. मराठी व हिंदी सारेगमप या कार्यक्रमाच्‍या त्‍या विजेत्‍या ठरल्‍या आहेत. बुध्‍द भीमगीतांच्‍या या सुमधुर कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्‍थीत राहण्‍याचे आवाहन सांस्‍कृतीक कार्य संचालनालयाद्वारे करण्‍यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here