घुग्घुस शहरात “तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी” अभिवादन रॅली

0
255

घुग्घुस शहरात “तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी” अभिवादन रॅली
जय भीमच्या जयघोषाने दुमदुमले शहर


विशेष प्रतिनिधी/पंकज रामटेके
घुग्घुस शहरातील नवनियुक्त पुतळा महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर परिसरातील ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम अनुयायांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अलोट बौद्ध बांधव व परिसरातील बरेच पक्ष समाज बांधवानी गर्दी केली होती.

यावेळेस घुग्घुस येथील वार्डा – वार्डातील सर्व विहार, आम्रपाली बौद्ध विहार, रमाबाई बौद्ध मंडळ, महाप्रज्ञा बौद्ध विहार, जैतवन महाबोधी बौध्द विहार, सारिपुत्त बौध्द विहार, तक्षशिला जनजागृत महिला मंडळ, गौतम सिद्धार्थ बौद्ध विहार, यशोधरा महीला मंडळ,आप,आपले विहारात सामुहिक बुद्ध वंदना एकत्रित होवुन ही रॅली पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस येथे एकत्रित येऊन भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस, यशोधरा महीला मंडळ घुग्घुस ने लेझीम पथक चे आयोजन करित लेझीम पथक द्वारे तसेच आम्रपाली बौध्द विहारतुन डिजेवर भीम गीतावर रॅली काढून एकत्रित येऊन शांतिपूर्ण नारे देत ही रॅली गांधी चौक, बँक ऑफ़ इंडिया, ते तहसील कार्यालयात नवबौद्ध स्मारक समिती घुग्घुस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा येथे समारोपीय कार्यक्रम आयोजित केला होता.

नवबौद्ध स्मारक समितीने रॅलीत येणारे बांधवाचे पृष्प फुलाने स्वागत करण्यात आले.तसेच तथागत गौतम बुद्ध,प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बौध्द वंदना घेण्यात आली,लेझीम पथकानी भीम गीतावर लेझीमच्या तालात नृत्य सादर करण्यात आले.तसेच सर्व बौद्ध बांधव, परिसरातील समाज बांधव व सामाजिक पक्ष नेते तसेच पोलीस निरीक्षक आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शान्तिपूर्वक शोभा वाढवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here