एनएसयुआय (NSUI)अध्यक्षपदी आकाश चिलका यांची नियुक्ती

0
253

एनएसयुआय (NSUI)अध्यक्षपदी आकाश चिलका यांची नियुक्ती


घुग्घूस : काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी शाखेची नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) शहर अध्यक्षपदी आकाश चिलका यांची निवड करण्यात आली आहे. घुग्घूस येथे एनएसयुआयच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा करिता एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शफाक शेख, काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी, याकूब पठान यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत सर्व कार्यकर्त्यांच्या एकमताने आकाश यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय नेते रोशन लाल बिट्टू यांच्या हस्ते चिलका यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

चिलका यांच्या नियुक्ती निमित्त काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सुधाकर बांदूरकर, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, अलीम शेख, मोसिम शेख, विशाल मादर, युवा नेते अनुप भंडारी, रोहित डाकूर, सुकुमार गुंडेटी, बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, सुनील पाटील, रफिक शेख, कपील गोगला, सन्नी मंडल, अरविंद चहांदे, बल्ली भाई, साहिल सैय्यद, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे, जुबेर शेख,सद्दाम शेख,आशिष चिल्का, शुभम घोडके यांनी चिलका यांना नियुक्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here