हिंगणघाट शहर व हिंगणघाट मतदार संघातीलव फूटपाथ, अतिक्रमण, झोपडपट्टी धारकांना कायम स्वरूपी पट्टे घ्या – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0
607

हिंगणघाट शहर व हिंगणघाट मतदार संघातीलव फूटपाथ, अतिक्रमण, झोपडपट्टी धारकांना कायम स्वरूपी पट्टे घ्या – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे पालकमंत्री सुनिल केदार यांना निवेदन

काही दिवसा आधी तहसील कार्यालयावर धडकला होता मोर्चा, मागणी पूर्ण न झाल्यास झोपडपट्टी धारक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

अनंता वायसे (०५ मार्च) हिंगणघाट शहर व हिंगणघाट मतदार संघातील झोपडपट्टी वासियांना त्यांच्या भोगवटया खालील भूखंड भाडे पट्ट्यावर देऊन किंवा त्यांना पर्यायी भूखंड देऊन पुनर्वसन करण्यात यावे तसेच हिंगणघाट शहरातील फूटपाथ अतिक्रमण धारकांना शहरातील नगर परिषद महसूल विभागाच्या हद्दीतील जागा देऊन पट्टे वाटप करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनिल केदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली.
केंद्रात भारतीय जनता पार्टीचे व राज्यात महा विकास आघाडीचे सरकार असून राज्यातील गोरगरीब जनता झोपडपट्टीत राहणारे कामगार,शेतमजूर घटकांमधील जनतेच्या बाबतीत सरकारने योग्य ते पाऊल उचलले नाही.त्यामुळे कष्टकरी व गोरगरीब जनता अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.
दिनांक 01-01-1995 च्या मतदार यादीत नावे असलेल्या पात्र झोपडपट्टी वासियांना त्यांच्या भोगवटाखाली भाडेपट्टीवर देऊन किंवा त्यांना पर्यायी भूखंड देऊन पुनर्वसन करण्याबाबत शासनाचे वेळोवेळी परिपत्रक आहे. तरीसुद्धा आज पर्यंत कोणत्या झोपडपट्टीवासियांना पट्टे वाटप करण्यात आले नाही शासन परिपत्रक काढते परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही असे दुर्दैवी चित्र आहे. तरी हिंगणघाट , समुद्रपूर व सिंधी (रेल्वे) मतदार संघातील सर्व झोपडपट्टी वासीयांना तात्काळ पुनर्वसन करून पट्टे वाटप करण्याची विनंती माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच शासन निर्णय कं.गवसु 2016/प्र. क्र.8/ झोपनी-२ गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचे दिनांक 3 जानेवारी 2017 नुसार अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाच्या लोकांना कोणतीही रक्कम न घेता भूखंड वाटप करण्याचे निर्देश असताना सुद्धा कोणत्याही झोपडपट्टी वासीयांना पट्टे वाटप करण्यात आले नाही तसेच हिंगणघाट शहरात शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरीब लोकांची वस्ती आहे.शहरातील गोरगरीब जनता पोट भरण्यासाठी रस्त्याच्या बाजूला भाजीपाला, फळाचे दुकान, कपड्याचे दुकान, पानठेला, टेलर दुकान,
चप्पलचे दुकान , कोल्ड्रिंगचे दुकान ,लाऊड स्पीकरचे दुकान, बांगड्याचे दुकान, भांड्याचे दुकान, काँक्रिटचे दुकान, विड्याच्या पानाचे दुकान इत्यादी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
दिनांक 23-11-2017 पासून हिंगणघाट शहरातील अतिक्रमण काढणे सुरू आहे. त्यामुळे गोरगरीब जनता हताश झाली आहे त्यांचे रोजगार बंद पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे .तरी त्यांना नगर परिषद महसूल विभागाच्या हद्दीतील जागा देऊन पट्टे देण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यावतीने करण्यात आले.
तसेच समुद्रपूर येथील तहसिल कार्यालयाच्या मागे गेल्या ४३ वर्षांपासून असलेले बांबु फाटे व ईतर व्यवसाईक वास्तवात आहे. त्याना कायम स्वरुपी पक्के पट्टे देण्यात यावे.
सन १९७५ ते १९७६ पासुन बांबुचे व ईतर दुकाने पंचायत समिती समुद्रपुरने लावण्यास प्लाँट दिले होते. त्या जागेचा दुकानदाराने किराया दिल्याचे सांगितले १९८१ ते १९८२ पर्यंत व ईतर कर दिल्याचे सांगितले आहे. सदर दुकाने चालु असताना हि जागा तहसील कार्यालयाची आहे ति जागा खाली करुन द्यावी असे तहसीलदार यांनी सांगितले. या सर्व फूटपाथ अतिक्रमण झोपडपट्टी धारकांच्या मागण्या माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री सुनिल केदार यांना केली आहे. त्यावेळी झोपडपट्टी धारक बाबाराव कांबळे,सुभाष कांबळे, वंदू नन्नावरे ,श्याम बलखंडे ,सागर पाटील, दिगंबर मेश्राम ,दिलीप मुंगसे ,सुधीर सांगळे ,अश्रफ अली गुलाम अली, मंजुर शेख, नाजरूम खान, बंडू पेंदोर, देविदास कोवे, राकेश जनबंधू, दिलीप बावणे, राजू मुंगले, शेठ पठाण रज्जाक ,गुड्डू अली, शेख हसन ,शेख रज्‍जाक, शेख जुनेद शेख वहीद, पिया खान ,मिया खान पठाण, शेख अमीर शेख बब्बू,नरेंद्र गायकवाड, शेख हुसेन शेख इब्राहीम, जमीर सय्यद, हुसनबानो पठाण, मेहमुनिसा पठाण, शबाना पठाण, अक्रम खान पठाण, रशीदा पठाण, आनंदा गवळी, शेख युसुफ शेख करम, सुमन जोगदंड, अमित पठाण इत्यादी झोपडपट्टीधारकांची उपस्थिती होती तसेच श्याम एडपवार, गुड्डू अली, सय्यद महाराज, मरदान अली, शकील अहमद, रवी कांबळे, मेराज सय्यद, निखिल कांबळे, अखिल धाबर्डे, शैलेश चांदुरकर ,साहिल कांबळे,मधुकर कुटे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here