गोवारीगुडा मध्ये माणिकगढ सिमेंट वर्क्स सीएसआर अंतर्गत प्रौढ शिक्षण कार्यक्रम आयोजित…
गोवारीगुडा गांवात नुकताच माणिकगढ सिमेंट, सी एस आर अंतर्गत प्रौढ शिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात सरपंच मनीषा पेंदोर, आशा वर्कर दुर्गा नागोसे,अंगणवाडी ताई सिंधुताई भगत, बचतगट समुदाय संसाधन व्यक्ति इंदू ताई गौरकर यांचि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
या उपक्रमात सहभागी लाभ घेणार्या महिला एकून 8 असून भविष्यात यात वाढ होईल अशी आशा आहे.
हा उपक्रम 2 महिने राहणार असून यात महिलांना अक्षराचे व अंकाचे ज्ञान, मुळाक्षरे लिहणे व वाचणे दैनंदिन जीवनात उपयोगी येणारे व्यवहारि ज्ञान पायभूत वाक्य तयार करणे व लिहिणे तसेच सशक्त बनन्याचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
या सर्व महिला महिला सशक्तिकरणाच्या उदाहरण आहेत कारण या कुटुंबातील जबाबदारी सांभाळून शिक्षित होण्याकरिता स्वतः पुढे आलेल्या आहे.
असे म्हणतात कि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षण माणसाला सुसंस्कृत बनवते..आजच्या आधुनिक युगात शिक्षण हे शस्त्र मोठे आहे.
हे लक्षात घेत गांवातील निरक्षर महिला साक्षर व्हावी या करिता या उपक्रमाची सुरवात माणिकगड सिमेंट च्या सी एस आर अंतर्गत सुरु करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी गावातील सर्व महिलांनी आणी सरपंच नोकारी, आशा वर्कर ,अंगणवाडी ताई, समुदाय संसाधन म्हणुन काम करणार्या इंदू ताई यांनी माणिकगढ सिमेंट वर्क्स, सि.एस.आर टीम चे आभार मानले.