अमलनाला धरण करतोय पर्यटकांना आकर्षित,वेस्टवेअरचे दृश्य मनमोहक.

0
948

अमलनाला धरण करतोय पर्यटकांना आकर्षित,वेस्टवेअरचे दृश्य मनमोहक.

कोरपना ता.प्र. प्रवीण मेश्राम

गडचांदूर शहरापासून अवघ्या चार किमीच्या अंतरावर असलेल्या माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या अंमलनाला धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ झाल्याने येथील आकर्षक,नैसर्गिक,मनमोहक वातावरणाचा अस्वाद घेण्यासाठी परिसरातील पर्यटकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.येथील वेस्टवेअर वरून वाहणारा पाणी पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा ठरत असल्याने कित्येकांना सेल्फीचा मोह आवरता येत नसल्याचे पहायला मिळत आहे.कोरोना काळात “घरी रहा सुरक्षित रहा” असे आवाहन शासन प्रशासनाने केले होते.यामुळे लोकांना कुठेच जाता आले नाही.मात्र आता कोरोनाची लाट ओसरल्याने सर्वत्र नागरिकांची रेलचेल पहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर याठिकाणी सुद्धा दररोज शेकडो पर्यटक भेट देऊन नैसर्गिक दृश्यांचे मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे.याठिकाणी येणारे पर्यटक विशेषतः तरुणाईच्या उत्साह वाखाणण्याजोगा असून यांच्या आनंदावर विरजण पडु नये यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here