महिला तलाठी कर्मचारी यांची भर रस्त्यात छेड… उप सरपंच वर गुन्हा.

0
530

महिला तलाठी कर्मचारी यांची भर रस्त्यात छेड… उप सरपंच वर गुन्हा.

 

प्रतिनिधी /ज्ञानेश्वर गायकर 

अहमदनगर/ संगमनेर:   काल संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील उप सरपंच गणेश साहेबराव शिंदे याने त्याच गावातील महिला कामगार तलाठी यांच्या बरोबर काल(२६/७) दुपारी तीनच्या सुमारास गैरवर्तन केले असल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

महसूल कर्मचारी यांना काही दिवसापूर्वी, मंगळापुर, कौठे गावात ही असच प्रकार घडला होता. विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा तालुका व मतदारसंघ असून , आरोपी गणेश शिंदे हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

काल दुपारी संगमनेर येथील महिला कर्मचारीआपले काम आटपून तहसील कार्यालयात जात असताना आरोपीने त्यांना हाक मारून भर रस्त्यात थांबवले. थांबिण्यासाठी त्यानी अर्वाच भाषेचा ही वापर केला.माझ्या फेरफार चे काय झाले , तुमच्या कार्यालयात कोण कोण टटू ठेवलेत ,अस म्हणत त्या चालवत असलेल्या दुचाकीची चावी काढून घेऊन, त्यांच्या हातातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे फाडून टाकली. तुमच्या तोंडाचे मास्क काढा , तुमचा फोटो घेतो आदी अश्लील वर्तन केल्याचा आरोप महिला कर्मचारी यांनी केला आहे.

हा सर्व प्रकार झाल्यानंतर महसूल कर्मचारी महिला यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होऊ नये या करिता मोठा दबाव आणला जात होता, असे ही समजले आहे. मात्र पोलसांनी या गुन्हाची नोंद केली आहे.

गावातील महिला कामगार तलाठी यांनाच गावातील पदाधिकारी यांनी भर रस्त्यात शर्मनाक कृत्य करावं या बद्दल महसूल संघटना यांनी तीव्र विरोध करायला पाहिजे, आरोपीला अटक तत्काळ करायला पाहिजे. महसूल उच्य पदस्थ अधिकारी यांनी महिला कर्मचारी संरक्षण कायद्या नुसार महिला कामगार यांच्या हक्काचे पालन करणे ही गरजेचे आहे.सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर नेहमीच कठोर टीका समाजात लोक करत असतात.चार दोन कर्मचारी, अधिकारी यांच्या मुळे कर्मचारी बदनाम होतात, ते ही प्रकार टळले पाहिजेत. गावगुंड लोकांना धडा शिकवला गेला पाहिजे, अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here