वंचित बहुजन आघाडी तालुका कोरपणाच्या विद्यमाने येत्या 15 फेब्रुवारीला कार्यकर्ता मेळावा

0
750

वंचित बहुजन आघाडी तालुका कोरपणाच्या विद्यमाने येत्या 15 फेब्रुवारीला कार्यकर्ता मेळावा

 

कोरपणा : 15 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा कोरपणाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कोटावार कॉम्प्लेक्स, मध्यवर्ती बँक समोर, माता मंदिर जवळ, गडचांदूर येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणीचे विशेष समन्वयक कुशल मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, धीरज बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोमजी गोंडाणे यासह जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, कोरपना तालुका अध्यक्ष मधुकर चुनारकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित राहतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीच्या समाजिकीकरणाचे स्वप्न इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले. ओबीसीतील मोठ्या जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात गेल्या 70 वर्षात वाटा न मिळाल्यामुळे ते मुख्य प्रवाहापासून कोसो दूर राहिले. जातिव्यवस्थेने केवळ माणसाचीच नव्हे तर त्यांच्या प्रश्नांची विभागणी केली. त्यामुळे सर्व बहुसंख्य वंचित समाज घटकांचे प्रश्न ऐरणीवर आले. आरक्षण, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, मुस्लिम व दलित यावरील हल्ले यात मोठ्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. संविधान प्रभावहीन करण्याचे कट कारस्थान जोर धरू लागल्याने लोकशाहीला वाचविण्याचे मोठे आव्हान वंचित बहुजन समाजाच्या पुढे उभे ठाकले आहे.

होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रस्थापितांना डावलत वंचित बहुजन आघाडीला बळ देण्याचा निर्धार सर्वच वंचित समाज घटकातून भव्य स्वरूपात उसळी घेताना दिसत आहे. यामुळे सदर कार्यकर्ता मेळाव्याला कोरपना तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्ता, पदाधिकारी सह शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका उपाध्यक्ष विजय जीवने, तालुका महासचिव साजिद शेख, विक्की खाडे, गडचांदूर शहर महासचिव राजेंद्र नळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here