गोंडपिपरी तालुक्यातील विजेचा लपंडाव थांबवा ; अन्यथा आंदोलन

0
494

गोंडपिपरी तालुक्यातील विजेचा लपंडाव थांबवा ; अन्यथा आंदोलन

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची विज वितरण कार्यालयात धडक 

 

कोठारी/चंद्रपूर/प्रतिनिधी/राज जुनघरे :- गोंडपिपरी तालुक्यातील विजेचा लपंडाव ही नित्याचिच बाब झाली आहे.या पंधरवाड्यात तर रात्री-बेरात्री अन भरदिवसासुद्धा विजपूरवठा खंडीत होत आहे.मान्सूनचे दिवसं असली तरी वाटेल तेव्हा लाईन जाण्याचा प्रकार तालुक्यात वाढला आहे.परिणामी गोंडपिपरी शहरासह ग्रामिण भागातील नागरिक आता त्रस्त झाले आहेत.यामूळे तालुक्यात वेळी-अवेळी होणारा विजेचा लपंडाव थांबवा आणि सुरळीत विद्यूत पूरवठा करावा,या मागणीला घेऊन बूधवारी(दि.१६)महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विज वितरण कंपणीचे कार्यालय गाठले.यावेळी शिवसेनेचे हरमेलसिंग डांगी यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळाने निवेदन देत विजेचा लपंडाव थांबवण्याची मागणी केली.अन्यथा कंपणीच्या भोंगळकारभाराविरोधात आंदोलनाचा ईशाराही यावेळी देण्यात आला.

 

गोंडपिपरी तालुक्यात विजेचा लपंडाव ही नेहमीचीच बाब झाली आहे.सद्या पावसाचे दिवस असल्याने पाऊस असो वा नसो,वादळवारा असो किंवा नसो विजपूरवठा अधून-मधून,वेळी-अवेळी खंडीत होत असतो.यामूळे गोंडपिपरी शहरासह ग्रामिण भागांतील नागरिक त्रस्त झाले आहेत.अलिकडेच “ब्रेक द चेन”नंतर आता जनजीवन हळूहळू रुळावर येतांना दिसत आहे.शहरातील दूकाने उघडू लागली.असे असतांना विजेचा लपंडावाचा फटका लघूव्यावसायिकांना बसत आहे.ग्रामिण भागातील पाणिपुरवठा योजना देखिल यामूळे प्रभावित झाल्या आहेत.विजपूरवठा अधून-मधून खंडित होत असल्याने महिलांना देखिल भर पावसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.यातच मागिल दोन वर्षापासून अधूनमधून होत असलेल्या सततच्या लाॕकडाऊननंतर देखिल ही सामान्य जनता निमूटपणे विजबिलांचा भरणा करित आहे.तेव्हा त्यांना सुरळीत सेवा देण्याऐवजी हलगर्जीपणा करित आहे.यासाठी म्हणून बुधवारी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विज वितरण कंपणीचे कार्यालय गाठले.यावेळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विजेचा लपंडाव थांबवण्याची मागणी केली.अन्यथा कंपणीच्या भोंगळकारभाराविरोधात आंदोलनाचा ईशाराही दिला आहे.यावेळी राष्ट्रवादीचे अरुण वासलवार,काँग्रेसचे महेंद्र कुनघाडकर,गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे सुरज माडूरवार,तारडाचे सरपंच तरुण उमरे,शिवसेनेचे आनंदराव गोहणे,बळवंत भोयर,भगवान कुमरे आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here