अशोक दिगांबर जाधव यांचे संस्थेला शाहू फुले आंबेडकर पुरस्काराने सन्मानित

0
82

अशोक दिगांबर जाधव यांचे संस्थेला शाहू फुले आंबेडकर पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन 2019-20 ते 2022 ते 2023 या कालावधीतील पुरस्काराचे नाव डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णाराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार, वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता मंगळवारी 12/3/24 सकाळी 10 वाजता स्थळ नॅशनल सेंटर फॉर परफाॅर्मिग आर्ट्स (NCPA) जमशेद भाभा नाट्यगृह मुंबई 4000021 येथे समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणी कृत, उल्लेखनीय, कार्य करणारी, स्वयंसेवी संस्था व कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री तसेच प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, रामदास आठवले राज्यमंत्री सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, राहुल नार्वेकर अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा संजय बनसोडे क्रीडा मंत्री, संजय सावकारे माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री माजी सुमंत भांगे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ओम प्रकाश बकोरिया आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पिटीगुडा नं 1 पो नंदप्पा ता जिवती जिल्हा चंद्रपूर येथील संस्थेला सन 2019-2020 या सत्रातील शाहू फुले आंबेडकर पारितोषिक, धनादेश, शाल श्रीफळ व भारताचे संविधान पुस्तक देण्यात आले. वितरण सोहळ्यात संस्थाचे अध्यक्ष अशोक दिगांबर जाधव, सचिव स्वाती अशोक जाधव सतीश गोटमुखले उपाध्यक्ष दिगांबर जाधव सहसचिव कैलास जाधव कोषाध्यक्ष वनिता जाधव विमल जाधव प्रकाश जाधव अरुण जाधव सहभागी झाले होते सर्व संस्थेचे सदस्य मंडळीं कडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले व ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने व महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक पोलिस शिपाई भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र संघटना, महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनेचे वितिने हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख व पुनम असेगावकर मॅडम व माकोडे साहेब व बावणे साहेब, गणेश सर यांचे वितीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here