महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा निषेध

0
66

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा निषेध

निवडणुकीच्या काळात महात्मा फुले चौक यवतमाळ येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा अज्ञात समाजकंटकांनी प्रयत्न केला. समाजकंटकाचा शिव फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जाहिर निषेध करून समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली.
आजही महात्मा फुलेंच्या विचारसरणीला समोर येऊन भिडण्याची ताकत समाजकंटकात नाही म्हणून महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करून समाजातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो. पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. वेळीच अशा समाज विघातक लोकांवर आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व आरोपींना अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी नंदूभाऊ नागरकर, हिराचंद बोरकुटे, प्रा. अनिल डहाके, विलास माथनकर, गोमती पाचभाई, विजय नळे, अवधूत कोटेवार, प्राचार्य नरेंद्र बोबडे, देवा पाचभाई,भास्कर सपाट, कोमल खोब्रागडे, मनोज वासेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here