लोक विकास संघटनेकडून पिक विमा बाबत तहसीलदारांना निवेदन

0
487

 

( तालुका प्रतिनिधी✍🏻रत्नदिप तंतरपाळे )

 चांदूर बाजार (कृष्णापुर):- चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा, ब्राम्हनवाडा थंडी,व बेलोरा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यावर्षीचा सोयाबीन व कपाशीचा पिक विमा विमा कंपनीने नामंजूर केलेला आहे. मागील वर्षी पूर्ण चांदुर बाजार तालुक्यातील सोयाबीन व कपाशीचे पीक पूर्णता उद्ध्वस्त झाले होते. सोयाबीन पीक तर काही शेतकऱ्यांनी शेतामधून कापणी सुद्धा केली नव्हती. एवढी गंभीर परिस्थिती सोयाबीन पिकाची झाली होती. त्याचप्रमाणे कपाशीची सुद्धा जवळपास सारखीच परिस्थिती झाली होती. मागील वर्षी या तिन्ही मंडळातील शेतकर्‍यांनी दोन्ही शेती पिकाचे पिक विमा काढलेले होते सदर मंडळातील सर्व शेतकऱ्यांना आश होती की पिकाचे नुकसान झाल्यामुळे आपल्याला पिक विमा मिळणारच आहे परंतु विमा कंपनीच्या तकलादू भूमिकेमुळे व कृषी विभाग व महसूल विभागाचे हलगर्जीपणामुळे मागच्या वर्षीचा सोयाबीन व कपाशीचा पिक विमा सदर मंडळातील कास्तकारांना मिळाला नाही त्यामुळे व्यथित होऊन परिसरातील सर्व कास्तकाराच्या वतीने लोकविकास संघटनेचे संस्थापकअध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात सदर तीनही मंडळातील पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचा लाभ मिळावा या करिता चादुंर बाजार तालुका तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रमन लगोटे, चेतन चुनडे, अभिजीत पोहकार, सागर राऊत, राहुल ठाकरे, वानखेडे, सुधीर तायडे, गजानन नान्हे, गौरव उल्हे, कमलेश धाडसे, प्रविन फुकट, विजय राऊत सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here