केंद्र शासनाच्या इंधन दर वाढीच्या निषेधार्थ मूल तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने गांधी चौकातील पेट्रोल पंपावर निदर्शने !  

0
491

चंद्रपूर /( ✍🏻किरण घाटे ) मूल -: महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष ना.नानभाऊ पटोले व शासनाचे मदत पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या मूल दौऱ्याच्या निमित्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व जि. प.माजी अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या इंधन दर वाढीच्या निषेधार्थ आज सोमवार दि. ७जूनला स्थानिक गांधी चौकात व पेट्रोल पंप येथे दुपारी १ वाजता मूल तालुका व शहर कांग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी देत निषेध करण्यात आला. या निषेध मोर्चाचे नेतृत्व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केले .

सदरहु मोर्चात तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखरे बाजार समिती उपसभापती संदीप कारमवार,संचालक अखिल गंगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार, युवक कांग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार,महिला तालुका कांग्रेसच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार, मूल शहर कांग्रेसचे अध्यक्ष विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील शेरकी, सोसायटी सभापती पुरुषोत्तम भुरसे, नगर सेवक विनोद कामडे,ललिता फुलझेले, माजी महिला तालुका अध्यक्षा वैशाली पुलावार, माजी जि.प.सदस्या मंगला आत्राम, त्रिष्ण सुरमवार, ओबीसी कांग्रेसचे अध्यक्ष गुरुदास चौधरी,

ग्रामीण कांग्रेसचे जेष्ठ नेते दीपक वाढई, संचालक शांताराम कामडे, सरपंच रवींद्र कामडे, तालुका व शहर कांग्रेसचे पदाधिकारी सुरेश फुलझेले, कैलाश चलाख,अन्वर शेख, गणेश रणदिवे,विवेक मुत्यलवार, सुनील गुज्जनवार, उपसरपंच राहुल मुरकुटे, कांग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here