अँड. एकनाथराव साळवे यांचे निधनाने सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्राची फार माेठी हानी…

0
489

अँड. एकनाथराव साळवे यांचे निधनाने सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्राची फार माेठी हानी…

अधिवक्ता मेघा धाेटेसह अनेकांनी व्यक्त केल्या आपल्या भावना!

🟡चंद्रपूर🟣नागपूर🟣किरण घाटे🟡
चंद्रपूरचे भूतपूर्व आमदार, जेष्ठ साहित्यिक तथा एक विश्वासु प्रामाणिक समाजसेवक अँड. एकनाथराव साळवे यांचे काल शनिवार दि. १३ मार्चला व्रूध्दपकाळाने दुख:द निधन झाले. साळवे यांचे सामाजिक क्षेत्रात माेलाचे योगदान राहिले असुन त्यांचे निधनाने चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राची फार माेठी हानी झाल्याची भावना महाराष्ट्रातील सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका, वैदर्भिय जेष्ठ लेखिका तथा राजु-याच्या शिक्षिका अधिवक्ता मेघाताई धाेटे यांनी व्यक्त केली. एक विश्वास व प्रामाणिक समाजसेवक आपण गमावला अशी भावना मायाताई काेसरे यांनी एका शाेकसंदेशातुन व्यक्त केली. आदिवासी बांधवासाठी तथा सर्वसामान्य जनतेसाठी साळवे हे सातत्याने झटत हाेते. त्यांचे कार्य सदैव माझे स्मरणात राहील अशी भावना नागपूरच्या सहजं सुचलच्या सहसंयाेजिका प्रभा अगडे एका शाेकसंदेशातुन व्यक्त केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कामगारांच्या मुलांसाठी शाळा काढण्यांत एकनाथ साळवे यांचा माेलाचा वाटा राहिला आहे. चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यातील त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय असेच हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here