ग्रामपंचायतीमार्फत होणाऱ्या वसुलीमधून 5% रक्कम अपंग व्यक्तिना देण्यात यावी सुशिल बेले यांची मागणी

0
559

अमरावती / वरूड तालुका प्रतिनिधी (✍🏻निलेश निंबाळकर ): ग्रामपंचायत दरवर्षी होणाऱ्या वसुलिमधून मूकबधिर,मतिमंद यासारख्या नोदणी आलेल्या अपंग व्यक्तीना ५% रक्कम देण्यात येते ,परंतु तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत मार्फत या रकमेचे वाटप २०१९-२० व २०२०-२१ मध्ये झालेले नाही .

त्यासाठी आज दिनांक 7जून ला गटविकास अधिकारी , पंचायत समिती मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारे कळवण्यात आले.

रकमेचा परतावा या महिन्याच्या आत करावा नाहीतर सर्व ग्रामपंचायतींना ताला ठोको आंदोलन करण्यात येईल .

असा ईशारा वंचीत बहुजन आघाडी अमरावती जिल्हा महासचिव सुशिल बेले यांनी केला त्यावेळी अशोक गडलिंग, ऍड.प्रदीप दुपारे,अरविंद गाडगे,अमर हरले,विनोद सोनागोते,राहुल लांडगे, महेन्द्र निस्वादे,देविदास ब्राम्हणे, नितेश डबरासे,रोशन गाठे, सिद्धार्थ ढोके ,राहुल साहारे ,उमेश गणवीर,देविदास वानखडे,राहुल बारामते,स्वप्नील सावंत,प्रसाद दोड,राकेश गाठे, अक्षय तागडे,राकेश गाठे,तेजस नागले , अनिकेत रामटेके सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here