विविध मागण्यांच्या पुतर्तेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने धारीवाल कंपनीत काम बंद आंदोलन

0
558

विविध मागण्यांच्या पुतर्तेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने धारीवाल कंपनीत काम बंद आंदोलन

धारीवाल कंपनीची कामगार विरोधी भुमीका पून्हा एकदा समोर आली आहे. वार्षिक वेतनवाढीचे आश्वासन कंपनी व्यवस्थापणाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र त्याची पूर्तता अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामूळे वेतनवाढ लागू करा या प्रमूख मागणीसह इतर मागण्यांना घेऊन यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने धारीवाल कंपणी येथे काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
कामगार विरोधी धोरण राबविणारी कंपनी म्हणून धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची ओळख निर्माण होत आहे. येथील अधिका-यांच्या हुकुमशाही विरोधात आता यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघनेच्या वतीने बंड पूकारण्यात आला असून काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या कंपणीत काम करणा-या कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी वाढीव वेतन देण्याचे आश्वासन कंपणी व्यवस्थापणाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र कंपणी कार्यरत झाल्यापासून ७ वर्षाचा कालखंड लोटला असला तरी एकदासुध्दा येथील कामगारांना वार्षिक वेतनवाढ देण्यात आलेली नाही. तसेच दिलेल्या आश्वासनानुसार ३० टक्के वेतनवाढ आँक्टोबर २०२० पासून लागू होणे अपेक्षीत होते. मात्र याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामूळे वेतनवाढ देण्यात न आल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटणेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानूसार आज पासून संघटनेच्या वतीने धारीवाल येथे काम बंद आंदोलन सुरु केले आहे. विशेष म्हणजे धारिवाल कंपणीच्या कामगार विरोधी धोरणा विरोधात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली आहे. येथील कंपणीच्या अधिका-यांनाही बेरोजगार युवकांच्या रोषाला सामोर जावे लागले होते. याच रोषातून येथील एका अधिका-यांच्या कानशिलातही हाणल्याची घटना घडली होती. तरी मात्र कंपनीव्यवस्थापण कामगार हिताचे निर्णय घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here