भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेसने वाहिली आदरांजली

0
273

भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेसने वाहिली आदरांजली

घुग्घूस : देशाचे महान क्रांतिकारक जल जंगल जमीन जनजातीय अस्मिता व संस्कृती रक्षणासाठी इंग्रजी राजवटी विरोधात बंड पुकारणारे धरती आबा बिरसा मुंडा यांच्या 123 व्या पुण्यतिथी निमित्त घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले
व आदरांजली अर्पित केली

बिरसा मुंडा यांनी अगदी कमी वयातच इंग्रजी राजवटी विरोधात बंड पुकारून उलगुलांन संघटनेची निर्मिती करित हजारो आदिवासी तरुणांची फौज उभी केली
व याच सेनेच्या माध्यमातून इंग्रजांना कडवी झुंज दिली
वयाच्या पंचविसाव्या वर्षी 09 जून रोजी तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला अश्या या थोर भूमीपुत्राला आदरांजली अर्पित करताना खालील पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलिम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,आकाश चिलका,देव भंडारी,साहिल सैय्यद,अभिषेक सपडी,सुनील पाटील,संदीप चटकी,रफिक शेख,कपील गोगला,अंकुश सपाटे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here