अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा वंचित मध्ये प्रवेश
औरंगाबाद, दि.१२ – येथील शेकडो कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील हॉटेल जिमखाना येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद निकाळजे, निधोनाचे माजी उपसरपंच विनोद आदमाने, निवृत्त लेखाधिकारी जी .आर चिकटे ,आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक संजय आदमाने, अमोल लोखंडे, वाघरुळ सर्कल प्रमुख कपिल सूर्यनारायण, प्रशांत भांगरे ,विशाल आदमाने, रितेश खरात ,बाबासाहेब खंडाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित औरंगाबाद येथे एका कार्यक्रमा दरम्यान प्रवेश केला. यावेळी प्रदेश प्रवक्ते अमित भुईगळ , भीमराव दळे ,मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, उपाध्यक्ष अँड. अशोक खरात, अंकुश वेताळ, डॉ नितीन सोनवणे, प्रभाकर बकले ,योगेश बन, संदीप शिरसाट, राहुल भालेराव, सचिन कांबळे ,राहुल बनसोडे, राजू आदमाने आदींची उपस्थिती होती.
सुरेश नंदिरे
राज्य प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी
9867600300