गुरुनानक जयंती उत्सव निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

0
434

गुरुनानक जयंती उत्सव निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप

 

 

गुरुनानक जयंती उत्सव निमित्त समाज बांधवांच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, राशिद हुसेन, सलिम शेख, सतनाम सिंह मिरधा, तापुष डे, सविता दंडारे, भाग्यश्री हांडे, राम जंगम, प्रतिक शिवणकर, विनोद अनंतवार, दिनेश इंगळे, किशोर बोलमवार, बंडी कारिया आदींची उपस्थिती होती.

८ नोव्हेंबरला गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही समाज बांधवांच्या वतीने गुरुनानक देवजी यांचा जयंती उत्सव साजरा केल्या जात आहे. त्या निमित्त आज अंचलेश्वर गेट जवळील गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथुन शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे मंच उभारण्यात आला होता. ही शोभायात्रा मंचाजवळ पोहचताच मंचावर उपस्थित आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले या प्रसंगी येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रा येथे पोहचताच सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here