आदिवासी संघर्ष कृती समिती शिष्टमंडळाची आमदार सुभाष धोटे यांच्यासोबत चर्चा

410

आदिवासी संघर्ष कृती समिती शिष्टमंडळाची आमदार सुभाष धोटे यांच्यासोबत चर्चा

आदिवासी तरुणांच्या भविष्यावर शासनाने चिंतन करण्याची व्यक्त केली गरज

 

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
आदिवासी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार सुभाष धोटे यांची भेट घेऊन आदिवासी समाजाच्या विविध सामजिक समस्या सोडविण्यासाठी, आदिवासी तरूणांच्या भविष्यावर शासन, प्रशासनाने सकारात्मक चिंतन करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचे, शासन निर्णय क्रमांक. बीसीसी२०१८/प्र.क्र.३०८/१६-ब दिनांक २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ३१/१२/२०१९ पर्यत आदिवासी बेरोजगारांची १२५०० पदांची विशेष पदभरती मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयानी संदभिर्य शासन निर्णयानुसार गैर आदिवासीना अधिसंख्य पदावर वर्ग केले नाही तसेच अनु.जमातीच्या प्रवर्गाची पदे भरण्यात आलेली नाही.

मूळ आदिवासींना त्यांच्या संविधानिक हक्क व अधिकारापासून वंचित ठेवल्या जात आहे. अशी आदिवासी समाजाची व तरुणांची भावना झालेली आहे. २१ डिसेंबर २०१९ शासन निर्णय नुसार चंद्रपुर मधील बहुतांश कार्यालयामध्ये गैर आदिवासीची पदे अधिसंख्य पदावर वर्ग केले नाही. तसेच अनु.जमतीचे प्रवर्गाची पदे भरण्यात आलेली नाही. तेव्हा या सर्व समस्या सोडविण्यासाठी आमदार साहेबांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा, आदिवासी युवकांची विशेष पदभरती तात्काळ घेण्यात यावी.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कार्यालयातील अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रकरण जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित आहेत त्यासाठी विभागप्रमुखांकडून वारंवार विचारणा करणे आवश्यक असते परंतु एकदा प्रस्ताव पाठवल्यानंतर विभाग प्रमुख या कडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे अनेक गैआदिवासीचे वैधता प्रमाणपत्र नियोजित कालावधीमध्ये कार्यालयात येत नाही यावर तोडगा काढण्यात यावा, आदिवासी शेतकऱ्यांना अनुसूचित जमातीचे वनपट्टे व सातबारा देण्यात यावे, शेत जमिनी गैरआदिवासी कडून परत करण्यात याव्यात, पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोजगार व नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, विशेष लक्ष देऊन पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची विनंती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीची ५०% लोकसंख्या असलेल्या गावाचा सामावेश पेसा क्षेत्रात करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबत आमदार सुभाष धोटे यांनी शासनाकडे आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करून त्या सोडविण्यात येईल असे आश्वासन संबंधित शिष्टमंडळाला दिले.

या प्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प नियोजन आढावा बैठक समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील मडावी, आदिवासी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विजयसिंह मडावी, कार्याध्यक्ष सत्तरशह कोटनाके, विलास मडावी, विजय कुमरे, कृष्णा मसराम, मधूकर कोटनाके, धीरज मेश्राम, सिताराम मडावी, अनिल सुरपाम, संतोष कूळमेथे, अमृत आत्राम यासह समाजबांधव उपस्थित होते.

advt