पालगाव वाशीयांचे पक्क्या रस्त्याचे स्वप्न शेवटी आमदार देवराव भोंगळे यांनी केले पूर्ण
मे महिन्याच्या 30 तारखेपर्यंत रस्त्याचे वेळापत्रक तयार करून कामाला सुरुवात होणार
नांदा फाटा :- मागील चार दशकापासून अल्ट्राटेक माईन्स प्रवेशद्वार ते पालगाव पर्यंत पक्का रस्ता बनवून द्यावा या मागणीसाठी विविध निवेदन व पत्रव्यवहार तसेच बैठका पार पडल्या मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने बाखर्डी – पालगाव चे युवा सरपंच अरुण रागीट यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेकडोंच्या पुरुष महिला नागरिकांना घेऊन धरणा द्यायला सुरुवात केली धरणे आंदोलनाचे पर्यवसान सोमवारी सायंकाळच्या सुमारास नांदा फाटा चौकातील मुख्य प्रवेशद्वार बंद करून रास्ता रोको सुद्धा पुकारण्यात आला आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता निर्वाचन क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे हे आपल्या कार्यकर्त्यासह आंदोलनामध्ये सहभागी झाले मंगळवारी दिवसभर कामगारांच्या विविध मागण्या व पालगाव वासियांची रस्त्याची मागणी घेऊन कंपनी व्यवस्थापना सोबत उपविभागीय न्याय दंडाधिकारी रवींद्र माने साहेब अल्ट्राटेक माणिकगड गडचांदूर चे व्यवस्थापक गहलोत गडचांदूर चे ठाणेदार शिवाजी कदम यांचे समवेत चार ते पाच तास चर्चा झाल्या बैठका पार पडल्या शेवटी कंपनी व्यवस्थापनाचे माध्यमातून लेखी आश्वासन देण्याची तयारी दर्शविण्यात आली मात्र ऐनवेळी व्यवस्थापन्याने घुमजाव केल्याने आंदोलन पुन्हा चिघळले रात्रभर पडलेल्या भर पावसात सुद्धा मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करते दाटून बसून होते मात्र बुधवार दिवसभर अतिवस्ततेमुळे आमदार महोदय आंदोलनात उपस्थित नसल्यामुळे अनेक तर्क वितर्क व चर्चेला उदान यायला सुरुवात झाली मात्र आमदारांनी पालगाव वासियांना दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलन करते ठाम धरणे देत होते एवढ्यातच दुपारी चार च्या सुमारास आमदार देवराव भोंगळे हे पालगाव वासियांच्या रस्त्याच्या बाबतीत लेखी आश्वासनाचे पत्र कंपनी व्यवस्थापना समवेत आंदोलनकर्त्यांच्या पुढे घेऊन आल्यामुळे आंदोलनकर्त्यांचा जीवात जीव आला आंदोलन स्थगित करण्यात आले मुख्य प्रवेशद्वार बंद केले गेल्यामुळे बाहेरून येणाऱ्या व आत मधून बाहेर जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा पाच किलोमीटर पर्यंत लागल्या गेल्या वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली कारखाना बंद पडू नये कोणतीही नुकसान होऊ नये याकरिता कार्यरत कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कंपनी प्रशासनाने आपल्या मर्जी मध्ये घेऊन कामगारांना कर्तव्यावर जाण्यास बाधित केले गेले अशी सुद्धा जनसामान्यात चर्चा सुरू होती.
शेवटी आंदोलनकर्त्यांच्या पुढे आमदार देवराव भोंगळे यांनी कंपनी व्यवस्थापनाला ठणकावत तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व रस्त्याच्या कामाची सुरुवात नियोजित वेळापत्रक त्याप्रमाणे न झाल्यास जून महिन्यामध्ये हजारो कामगारांच्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन ठेवले जाईल असा सुद्धा निर्वाणीचा इशारा दिला याशिवाय सर्व कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांना स्वतः घेऊन रस्त्याबाबतची वास्तविकता पाहण्यासाठी पालगाव दौरा सुद्धा करण्यात आला त्यांच्या या वास्तविक भूमिकेमुळे सर्व पालगाव वासियांनी आमदार महोदय यांचे आभार मानले व आंदोलनाची सांगता करण्यात आली.