आदिवासी सामाजिक संघटने तर्फे महानायक भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

0
624

तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे 

 

अमरावती/ चांदूर बाजार (कृष्णापुर):- धरतीआबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहाती गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा व आईचे नाव करमी मुंडा होते.बिरसा मुंडा लहानपणापासून हुशार व बुद्धीमान होते.बासरी वाजविणे, रानात जाऊन धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे.आदिवासीचे प्रस्थापिकांच्या व्यवस्थेविरुद्ध अनेक वेळा विद्रोह केला. इ. स.१७८९ ते १८३२ दरम्यान मुंडा जनजातीने अनेक विद्रोह आंदोलने केली. यातील जास्त प्रभावशाली विद्रोह १८३१- ३२ चा ‘कोल विद्रोह’मुंडा जनजातीच्या वडिलोपार्जित शेतजमीन छोटा नागपूरचे राजा यांचा लहान भाऊ हरनाथ सहाई याने बऱ्याच गावातील शेती जमीनदार, प्रस्थापित सावकार आणि परप्रातीय व्यापाऱ्यांना दिली. साहजिकच आदिवासीच्या परप्रातीय व्यापाऱ्यांबद्दल असंतोष वाढला. विद्रोहाची आग गावागावात गेली. सर्व परप्रातीयांना छोटा नागपूर भागातून हुसकावून लावले.यात विद्रोहात मुंडा ४०० मुंडा आदिवासी सहभागी झाले होते.नंतर,आदिवासीच्या न्यायहक्कांसाठी,अन्याय,अत्याचाराविरुद्ध जल,जंगल,संपत्तीसाठी बिरसा मुंडा यांनी अखंड लढा दिला.इंग्रज, जमीनदार, सावकार गरीब आदिवासींना शोषण,अत्याचार,अन्याय करीत होते. यांच्या परिणाम बिरसा मुंडावर झाला. त्यांनी सरकारी नोकरी करणेही नाकारले.बिरसा मुंडाने गावागावांत जाऊन शोषित,पीडित लोकांना जनजागृती करून ज्योत जागवली. जंगलात जे मिळेल ते खाऊन जनजागृती करीत होते.वैचारिक जागृती केली. बिरसा मुंडाने इंग्रज, जमीनदार यांच्या विरुद्ध’उलगुलान’ सुरू केले. ‘उलगुलान’ म्हणत ठेकेदार, जमीनदार, इंग्रज यांच्याविरुद्ध ‘उलगुलान’ सुरू केले. बिरसा मुंडा यांनी आपल्या नैसर्गिक न्याय हक्क जल, जंगल,संपत्तीसाठी संघर्ष केला.आदिवासी संस्कृती,आणि अधिकार यांचे संरक्षणासाठी त्यांची आंदोलने होती. त्यांच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपूर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले.या महान क्रांतिसूर्य योद्धाच्या अंत ९ जून १९०० रोजी झाला.आज त्या महामानव बिरसा मुंडा यांच्या 121 पुण्यतिथी निमित्त छोट्या खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी बिरसा क्रांति दल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन युवनाते ,आदिवासी विकास परिषद चे युवा कार्यधष्य विलास वाघमारे , अतुल परतेकी ,वैभव लोखंडे, शशिकांत आत्राम ,नितीन नार्मुर्ते ,अभय वाघमारे देवाशी वाघमारे उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here