चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठल्यानंतर शासनाची अधिसुचना जारी !

0
854

चंद्रपूर -✍🏻किरण घाटे -विशेष प्रतिनिधी -: विदर्भातील कामगार जिल्हा म्हणून आेळखल्या जाणां-या चंद्रपूर जिल्ह्यात गत पांच वर्षापुर्वि दारुबंदी करण्यांत आली हाेती .दारुबंदी केल्याने शासनाचा तब्बल २००काेटींचा वार्षिक महसुल बुडत हाेता असे बाेलल्या जाते. याच जिल्ह्यात २०१५ला दारुबंदी शासनाने घोषणा केली हाेती .परंतु दारुबंदी नंतर ही याच चंद्रपूर जिल्ह्यात अक्षरशा दारुचा महापूर वाहु लागला हाेता . हे खरे वास्तव आहे . पाेलिस विभाग दलाची गुन्हे अन्वेषण शाखा ही आण बाण शान समजली जाते .

या ही शाखेने गुप्त माहितीच्या आधारे अनेक अवैध दारु सम्राटांवर व विक्रेत्यांवर कारवायां केल्याचे सर्वश्रूतच आहे .माेठ्या प्रमाणांत कारवायां झाल्यानंतरही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारु माेठ्या प्रमाणात येत हाेती . दारु बाहेरुन येण्याचे व विक्रीचे प्रमाण कमी झाले नव्हते .सुशिक्षित बेराेजगारां साेबतचं शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनी देखिल दारु विक्रीच्या कामाला लागल्या हाेत्या .त्यांचेवर देखिल पाेलिसांनी गुन्हे दाखल केले असल्याचे समजते . एकंदरीतचं जिल्हाभर अवैध दारु विक्रीचे चित्र सर्वत्र द्रूष्टीक्षेपात पडत हाेते .सर्वाधिक ताण चंद्रपूर जिल्ह्यातील पाेलिस विभागावर पडत हाेता .अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवावी असा जनतेचा आग्रह हाेता .त्यानंतर जिल्हास्तरावर एका समिक्षा समितीची निर्मिती करण्यांत आली .सदरहु समितीने या संदर्भात अनेकांचे लेखी अभिप्राय मागविले हाेते.त्यात दारुबंदी उठविणा-यांची संख्या सर्वाधिक हाेती. महाराष्ट्र शासनाने २७ मे ला चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यांची घोषणा केली हाेती त्या नंतर लिंकर लाँबी सह मद्यप्रेमींच्या नजरा शासनाच्या अधिसुचनेकडे खिळल्या हाेत्या .काल याच संदर्भात ग्रूह विभागाने एक परिपत्रक जारी केल्याचे व्रूत्त आहे .त्यात काही अटी नमुद केल्या आहे . लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील बंद असलेली दारु दुकाणे व बार सुरु हाेणार यात आता तिळमात्र शंका नाही .या अधिसुचनाचे व्रूत्त कानावर पडताच काही दारु सम्राटांच्या चेह-यावर आनंद झळकु लागला आहे .हे ही तेव्हढेच सत्य आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here