आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर बाबुपेठ उड्डाणपुल, घुग्घुस उड्डाणपुल आणि धानोरा बॅरेजच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा बैठक

0
914

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर बाबुपेठ उड्डाणपुल, घुग्घुस उड्डाणपुल आणि धानोरा बॅरेजच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा बैठक

 

 

चंद्रपूर मतदार संघातील बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुल, घुग्घुस येथील उड्डाणपुल आणि धानोरा बॅरेजच्या कामात दिरंगाई होत आहे. याकडे आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेउन त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर सदर विकास कामांबाबत लवकरच उच्च स्तरिय आढावा बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगीतले आहे. त्यामुळे आता या कामांना गती प्राप्त होणार आहे.
चंद्रपूर येथील बाबूपेठ उड्डाणपूल बांधकामास दिरंगाई होत असून मनपातर्फे अप्राप्त निधी व प्रकल्पाची वाढीव निधी प्रस्ताव सादरीकरण करण्यात आलेला नाही. त्यामुळे या कामाला विलंब होत आहे. याच वर्षी सदर पुलावरून रहदारी सुरु करण्यात यावी या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना वांरवार निवेदन देत सदर विभागाकडून 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजुर करवून घेतला आहे. तसेच नवनिर्मित घुग्गुस नगरपरिषद येथे उड्डाणपुलाचे बांधकाम व वर्धा नदीवरील धानोरा बॅरेजच्या कामातही विलंब होत आहे. सदर सर्व कामे अतिमहत्वाची असुन हि कामे लवकर पुर्ण होतील या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे.

 

दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आज मुंबई मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असुन सदर सर्व विषयांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असुन हे सर्व विषय तात्काळ मार्गी लागावे यासाठी संबधित विभागाच्या अधिका-र्यांची लवकरच बैठक घेतल्या जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना दिले आहे. त्यामुळे मतदार संघातील या महत्वाच्या विकासकामांना गती मिळणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here