श्री.म.द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची मंगरूळ येथील साखर कारखान्याला क्षेत्र भेट

209

श्री.म.द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची मंगरूळ येथील साखर कारखान्याला क्षेत्र भेट

 

दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री.म.द.भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालय आर्णी जिल्हा यवतमाळ येथील वर्ग अकरावी व बारावी वाणिज्य शाखेची एक दिवसीय शैक्षणिक सहल डेक्कन शुगर फॅक्टरी मंगरूळ जिल्हा यवतमाळ येथे गेली होती. यात जवळपास ६० मुलींनी सक्रिय सहभाग घेतला. ही एक दिवसीय क्षेत्र भेट होती.

कारखान्याचे व्यवस्थापन कसे चालते, साखर कशी तयार होते, त्याचे विपणन कसे असते, तेथील कामगार – टेक्निशियन – गार्ड यांचं संघटनात्मक बांधणी अशा विविध घटकांची माहिती प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यानी करून घेतली. यासाठी प्रा. उमेश मोकळे सर, प्रा. प्रफुल मेहर सर, कु. क्षजागृती भगत मॅडम, कु. सुवर्णा राठोड मॅडम प्रा. संदीप पाटील सर यांनी अथक परिश्रम घेतले. या क्षेत्र भेटीसाठी प्राचार्य श्री रवि शेखर कोटावार सर, पर्यवेक्षक श्री प्रेमकुमार नले सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज सहारे सर यांनी सहकार्य केले.

advt