आशा भगत हिची पोलीस चालक शिपाई आणि पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड

0
321

आशा भगत हिची पोलीस चालक शिपाई आणि पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड

आर्णी : अरविंद नगर आर्णी येथील शेतकरी साहेबराव भगत यांची कन्या कुमारी आशा भगत हिची नागपूर पोलीस चालक शिपाई पदी आणि अकोला पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झालेली आहे. एकाच वेळी तिची दोन ठिकाणी निवड झाल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कठोर मेहनत, शारीरिक सुदृढता, अभ्यासात सातत्य त्यामुळे आपल्याला हे घवघवीत यश मिळाले असल्याचे तिने सांगितले आहे. विशेष म्हणजे तिचे साधे कुटुंब असून वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. तसेच ते दुधाचा पूरक व्यवसाय करतात. आई-वडिलांनी तिला संपूर्ण सहकार्य केले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलींनी शासकीय नोकरीत यावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ती म्हणाली.

भीम कन्या कुमारी आशा भगत यांनी आपले यशाचे श्रेय वडील श्री साहेबराव भगत, आई सौ.पल्लवी भगत, भाऊ सुमेध भगत, बहीण सौ. निशा मुनेश्वर तसेच आप्तस्वकीय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री नाईक सर तसेच तिच्या क्रीडा प्रशिक्षकांना दिलेले आहे.

तिने मिळवलेल्या यशाबद्दल अरविंद नगर येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेजारी राहणारे प्रा. मनोज सहारे, श्री दादाराव सूर्यवंशी, श्री भास्करराव तिवारी, श्री राजू मते तसेच अरविंद नगर येथील बांधवांनी तिचे भरभरून कौतुक केले. तसेच भविष्यात आमच्या मुला-मुलींसाठी आशा ही प्रेरणा स्तोत्र राहील असे सर्वांना वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here