ट्रक – ऑटोचा भिषण अपघात… माय लेकी ठार ; सात जण जखमी

0
660

ट्रक – ऑटोचा भिषण अपघात…
माय लेकी ठार ; सात जण जखमी

वणी : वणी वरुन शिंदोला येथे प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटोला भरधाव येणाऱ्या ट्रक ने जबर धडक दिली. या भीषण अपघातात माय-लेक ठार झाल्याची घटना आज गुरुवार दि. 6 एप्रिल ला 4:30 वाजता घडली.

संजीवनी अनंत नागतुरे (35) व अवनी अनंत नागतुरे (5) असे अपघातात ठार झालेल्या माय- लेकीचे नाव आहे. ते कुर्ली या गावातील निवासी आहेत. ऑटोने गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

वणी येथून सात ते आठ प्रवाशी ऑटो क्रमांक MH-29 AM-0013 मध्ये बसून शिंदोला येथे जात होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव येणारा ट्रक क्रमांक HR-58 C-0482 ने चक्क ऑटोला उडवले. अपघात प्रचंड भीषण होता.

अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले. या घटनेत माय-लेक ठार झाली असून तीन महिला व तीन पुरुष जखमी झाले. यामध्ये ऑटो चालक व दोन महिला गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here