“क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन” नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

0
489

“क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन” नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

राजुरा, १५ एप्रिल : सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने भाग घेऊन अग्रेसर राहणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने नागवंश युथ फोर्स राजुरा च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून महापुरुष, महामानव यांना खरी आदरांजली अर्पण करण्यात आली. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र आदरांजली वाहण्यात आली.

अमोल राऊत वर्षातून दोनदा रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरीब, गरजूंना नेहमी रक्ताची मदत मोठ्या सेवाभावेने करतात. काल 14 एप्रिलला परमपूज्य, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब यांच्या 132 व्या जयंती दिनाप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अर्पण करण्यात आले.

बुद्धभूमी बसस्थानक समोर राजुरा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून जयंती साजरी केली. यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

यावेळी शिबिरात सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत, राहुल अंबादे, रवि झाडे, अश्विन अंबादे, धनराज उमरे, आकाश नळे, जय खोब्रागडे, नूतन ब्राह्मणे, निखिल वनकर, यंग मेन्स बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन ग्रुप, ब्लड बँकेच्या चमुमध्ये सामाजिक सेवा अधिक्षक संजय गावित, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल रामटेके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आशिष कांबळे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ प्रशिक मेश्राम, परीचारक विपिन कोडापे, परिचारक संजय विश्वास, वाहन चालक रुपेश घुमे, परिचारक चेतन वैरागडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here