युवा स्वाभिमान पक्षाचा चंद्रपूर मेडिकल महाविद्यालयाला दणका!

0
478

युवा स्वाभिमान पक्षाचा चंद्रपूर मेडिकल महाविद्यालयाला दणका!

सूरज ठाकरेंच्या प्रयत्नाला मिळाले अखेर यश, कामगार वर्गात पसरले आनंदाचे वातावरण !

चंद्रपूर । किरण घाटे

स्वाभिमान पक्षाचे नवनियुक्त चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या प्रयत्नातुन मेडिकल कॉलेज अंतर्गत काम करत असलेल्या कामगारांना काल पगारवाढ मिळाल्यामुळे संपूर्ण कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या बाबत असे कळते की शाप्रुजी पलोंजी या धनाढ्य कँन्स्ट्रक्शन कंपनीने चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या बांधकामाचा कंत्राट महाराष्ट्र शासनाकडुन घेतला आहे या ठिकाणी बरेच दिवसांपासून कामगारांची पिळवणूक होत असल्या बाबत ची माहिती युवा स्वाभिमान पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना काही दिवसा आधीच मिळाली होती.त्याच माहितीच्या आधारे सदरहु कंपनीला चार दिवसांपूर्वी सुरज ठाकरे यांनी जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून लेखी निवेदन देऊन कामगारांचे वेतन तथा इतर समस्यांबाबत दहा दिवसांमध्ये तोडगा काढण्याचा सूचना दिल्या होत्या तसे न झाल्यास मेडिकल कॉलेज चे काम बंद करण्याचा इशारा ठाकरे यांनी कंपनीला दिला होता. सुरज ठाकरे यांचे एकंदरीत जुनी आंदोलने व पार्श्वभूमी बघता कंपनीने त्याचा धसका घेतला व काल गुरुवार दि.२८आँक्टाेबरला सुरज ठाकरे यांना चर्चेला बोलून त्यांनी निवेदनामध्ये दिलेल्या सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत .दरम्यान सूरज ठाकरे यांचे उल्लेखनिय कामगिरीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात ते कामगार वर्गात प्रसिध्दीच्या झाेतात आहे अमरावतीचे आमदार रवी राणा व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे मार्गदर्शना खाली ते कामगारांचे प्रश्न व मागण्या या जिल्ह्यात तातडीने साेडवित असल्याचे एकंदरीत दिसुन येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here