राजुरा शहरात दुकाने सील, तहसीलदार यांच्या आदेशाने शासकीय निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

0
1599

राजुरा शहरात दुकाने सील, तहसीलदार यांच्या आदेशाने शासकीय निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

राजुरा, अमोल राऊत : कोरोना महामारीच्या महाभयंकर लाटेला थोपविण्यासाठी कडक निर्देश देण्यात आले आहेत. १ मे पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीची कडक अमलबजावणी सुरु असताना राजुरा शहरात ११:३० ते १२:३० या कालावधीत काही दुकाने आदेशाला धाब्यावर मांडून सुरु ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यादुकानावर कारवाई करत सील करून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
सकाळी ७ ते ११ जीवनावश्यक वस्तू दुकाने वगळता इतर सर्व दुकाने १ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शंकर किराणा अँड जनरल स्टोअर्स, सोमनाथपुर राजुरा, सुनील इलेक्टरीकल्स नाका नं. ३, वासवी किराणा स्टोअर्स नाका नं.३, शबाब स्टील अँड सिमेंट नेहरु चौक, जे. के. मोबाईल आंबेडकर चौक या आस्थापणावर कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई महसूल विभाग, पोलीस विभाग व नगरपरिषद विभागाने संयुक्तिकपणे केली. तहसीलदार हरीश गाडे यांच्या निर्देशात महसूल विभागाचे पटवारी राहुल श्रीरामवार, सुभाष साळवे, माहुरे, नगर परिषदेचे कर निरीक्षक अक्षय सूर्यवंशी, उपेंद्र धामनगे, विरेंद्र धोटे, हरीश पाटील व पीएसआय वर्षा तांदूळकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here