मॅजिक बस च्या कार्याची शिक्षणाधिकारी यांनी घेतली दखल

0
518

मॅजिक बस च्या कार्याची शिक्षणाधिकारी यांनी घेतली दखल

 

 

बल्लारपूर (चंद्रपूर), नागेश नेवारे

आज दिनांक, 26 सप्टेंबर 2021 ला मूल तालुक्यातील मोरवाही व बाबराळा या गावात चंद्रपूर दिपेंद्र लोखंडे सर जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, उपशिक्षणाधिकारी देशमुख सर, विस्तार अधिकारी खंडाळे सर, केंद्र प्रमुख गेडाम सर यांनी चंद्रपूर मध्ये सुरू असलेल्या नऊ तालुक्यात मॅजिक बस च्या खेळातून विकास जीवन कौशल्य या उपक्रमाची दखल घेतली त्यात शिक्षक कसे मुलांचे जीवन कौशल्य सत्र घेतात त्यातून कसे जीवन कौशल्य मुलांमध्ये रुजविता येत हे सत्र बघितले. वर्तणूक सुधार प्रणाली (BMS), अभ्यास कोपरा, ज्यात विद्यार्थ्यांची घरी अभ्यास कोपरा, वार्षिक चक्र, गट करार, पालक सत्र, शाळेचे धेय्य, मुलांच्या पालकांच्या सभा, शिक्षक सभा, गावातील पधाधिकाऱ्यांच्या सभा अश्या विविध उपक्रमाची पाहणी केली असता मा. शिक्षणाधिकारी लोखंडे सर व त्यांची टीम यांनी मॅजिक बस च्या कार्याचे भरभरून प्रशंसा केली व मॅजिक बस च्या कार्यासाठी वेळोवेळी विशेष सहकार्य देऊ अशी हमी दिली व सोबतच गावातील काही समस्या सोडविण्याची हमी दिली.

 

 

 

उपरोक्त मॅजिक बस च्या कार्याची दखल घेताना हे सर्व आयोजन मॅजिक बस चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाळण्यात आली तसेच शाळेतील मुख्याध्यापक मा.नैताम सर व सर्व शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती, मॅजिक बस ची मूल टीम निकिता ठेंगने तालुका समन्वयक, शाळा सहाय्यक अधिकारी सर्व मुल टीम तर गावातील समुदाय संघटक तसेच गावातील सर्व समस्थ पधाधिकारी व ग्रामस्थ या सर्वांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here