क्रीडांगणांसाठी युवकांनी हातात घेतला फावडा 

0
572
क्रीडांगणांसाठी युवकांनी हातात घेतला फावडा 
भीमशक्ती युवा संघटना : दोन एकर परिसराची स्वच्छता 
सावली : गृह विभागाने पोलीस भरतीची घोषणा करताच युवकांमध्ये आनंद पसरला. परंतु, सावली शहरात क्रीडांगणच नसल्याने शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र यावर भीमशक्ती युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी एकत्र येत तोडगा काढत स्वत:च हातात फावडा, कुऱ्हाड, घमेला घेवून शहरातील योगी नारायण बाबा मठाच्या मागील दोन एकर जागेची स्वच्छता केली. त्यावर क्रीडांगण तयार केले. आता तेथे शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करीत असून आपल्या स्वप्नाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. सावली हे तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र येथे क्रीडांगण नाही. तालुका क्रीडांगण हे मुख्यालयापासून पाच ते सहा किमी अंतरावर आहे. यातही तेथे पुरेशा सोई उपलब्ध नाही. परिणामी तेथे जावून शारीरिक क्षमता चाचणी तयारी करणे अडचणीचे आहे. येथील भीमशक्ती युवा संघटनेने अनेकदा निवेदन देवून नगरपंचायतीचे क्रीडांगण तयार करण्याची मागणी केली होती. मात्र त्यादिशेने कोणतेच पाऊले उचलली गेली नाही. त्यातच गृहव भागाने नव्या वर्षात पोलीस भरती करण्याची घोषणा केली. मात्र क्रीडांगणाअभावी शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे भीमशक्ती युवा संघटनेचे अंतबोध बोरकर, युवा अध्यक्ष प्रफुल्ल बोरकर, गब्बर दुधे यांनी पुढाकार घेऊन स्वत:च क्रीडांगण तयार करण्याचा निर्णय घेतला. याला संघटनेच्या सदस्यांनी तसेच शहरातील युवकानी प्रोत्साहन दिले. वर्गणी गोळा करण्यात आली. दररोज सकाळी – सायंकाळी योगी नारायण बाबा मठाच्या मागील बाजूस जावून स्वच्छता सुरु केली. आता तेथे रनिंग ट्रक, लांब उडीचे मैदान तयार केले आहे. शहरातील अनेक युवक येथे तयारी करण्यासाठी जात आहे. या उपक्रमात  भीमशक्ती युवा संघटनेचे अंतबोध बोरकर, युवा अध्यक्ष प्रफुल्ल बोरकर, गब्बर दुधे, अंकीत भडके, पुष्पकांत डोंगरे, प्रफुल्ल गोंगले, प्रशांत नारनवरे, बादल खोब्रागडे, चांदणी मडावी, अक्षदा दुधे, नितेश बोरकर, अक्षय बारसागडे, निर्वेद वाळके, प्रणित बोरकर, मैत्रेय सोमकुवर, चंदन डोहणे, साहील वासाडे, समीर देशमुख, विशाल रायपुरे तसेच भीमशक्ती युवा संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
बॉक्स संघटनेचे सात सदस्य सैन्यात भीमशक्ती युवा संघटनेचे तीन सदस्य मागील तीन वर्षांपासून सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यानाच पाहुन इतरांनीही परिश्रम घेतले त्यामुळे पुन्हा चार जणांची सैन्य दलात निवड झाली आहे. यासोबत इतर सदस्यही विविध पदावर कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here