माथोली येथे जल जीवन मिशन अंतर्गत कामाचे भुमिपूजन

0
171

माथोली येथे जल जीवन मिशन अंतर्गत कामाचे भुमिपूजन

घुग्घुस येथुन अंदाजे आठ (८) किलोमीटर अंतरावरील यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी तहसील येथील ग्रामपंचायत माथोली येथे दि.२९ जानेवारी २०२४ सोमवार रोजी मा.आ.श्री.संजीवरेड्डी बोदकूलवार विधानसभा क्षेत्र यांच्या स्थानीक विकास निधीतून जल जीवन मिशन अंतर्गत कामाचे भुमिपूजन करण्यात आले.तसेच माथोली ते साखरा रोडचे भुमिपूजन सोहळा व जुगाद गावातील नालीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. त्याबद्दल लोकार्पण सोहळा कार्यक्रम उत्साहात समारंभ पार पडला.

यावेळी कार्यक्रमात मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.विजयभाऊ पिदुरकर,किसान विकास आघाडी उपाध्यक्ष भाजपा मा.श्री. दिनकरराव पावडे, परिसरातील गावातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, महिला, पुरुष, युवा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here